पालकमंत्री यांच्या घराकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला, एससी उपवर्गीकरणाला विरोध...!

 0
पालकमंत्री यांच्या घराकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला, एससी उपवर्गीकरणाला विरोध...!

पालकमंत्री यांच्या घराकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला, एससी उपवर्गीकरणाला विरोध...

 जोरदार घोषणाबाजी, शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात...   

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात भूमिका जाहीर करावी या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने आज सोमवारी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता परंतु पोलिसांनी अर्ध्या रस्त्यातच मोर्चा अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्य शासनाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उपवर्गीकरण होऊ नये यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झाला आहे. उपवर्गीकरणाच्या विरोधात शहरांमध्ये धरणे निदर्शने मोर्चे असे आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले आहे. पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी उपवर्गीकरणाच्या संदर्भात कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्यामुळे समाज पार्टीच्या वतीने आज दुपारी संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सकाळपासूनच कांचनवाडी चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 12.30 वाजता पक्षाचे प्रदेश महासचिव तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कांचनवाडी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. श्रीहरी अपार्टमेंट पर्यंत पोहोचतात पोलिसांनी मोर्चा आडवीला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय शिरसाठ यांच्या घराकडे जाण्याचा आग्रह धरला. आम्हाला श्री शिरसाठ यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे आहे असे सांगत येथून निघण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी संजय शिरसाठ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत अरविंद कांबळे, शिवाजी वीर, विजय शिनगारे, मधुकर ढेपे, अनामी मोरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून सातारा पोलीस ठाण्यात आणले. पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करावी यापुढे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा श्री कांबळे यांनी यावेळी दिला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून त्यांना सोडून दिले. या मोर्चामध्ये प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, शिवाजी वीर, अनामी मोरे, मधुकर ढेपे, राहुल साबळे, प्राचार्य सुनील वाकेकर, तातेराव ससाणे, शेख जावेद, नवाब पटेल, राजू गवारगुर, विजय भिवसाने, रेखा राजभोग, सारिका जाधव, विश्वजीत बागुल, विजय वाहुळ, नरेश पारखे, दिनेश गवळी, नरेश वरठे, सुरेश जगधने, विनोद कीर्तीशाही, ज्ञानेश्वर राठोड, जावेद चाऊस, सचिन निकम यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow