अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा, ऑरेंज अलर्ट
दोन दिवस ऑरेंज अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन....
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) शहर व जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोर धरला असून हवामान विभागाच्या अंदाजात 1 व 2 सप्टेंबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहर व परिसरात आज चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 4.5 टक्के पावसाची नोंद झाली. थंड व वेगवान वाऱ्यासह, विजेच्या कडकडाटाने रविवारी रात्री व पोळ्याच्या संपूर्ण दिवशी पावसाचा हा इशारा देण्यात आला असून मंगळवारीही त्याचा जोर कायम राहील व ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहील, बुधवारी हलक्या तर गुरुवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडून थंड वारे वाहणार आहे.
दरम्यान या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
What's Your Reaction?