राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांकडून चांगला प्रतिसाद, 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्विकारले जातील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार इच्छुक उमेदवाराकडून चांगला प्रतिसाद...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज)
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने व शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला व शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे इच्छुक उमेदवारांकडून आर्ज मागविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे राष्ट्रवादी भवन हडको औरंगाबाद येथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद पुर्व,मध्य व पश्चिम मतदार संघातून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून दिलेत. या तीन्ही मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचे अर्ज दिनांक 29 ऑगस्ट पासून स्वीकारणे चालू असून दि.4 सप्टेंबर ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख असल्याची माहिती बूथ प्रमुख मोहम्मद हबीब व प्रसिध्दी प्रमुख तय्यब खान यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ माहिती दिली.
What's Your Reaction?