विद्यापीठ बंदला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, काल झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन्ही गटावर गुन्हा दाखल

 0
विद्यापीठ बंदला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, काल झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन्ही गटावर गुन्हा दाखल

विद्यापीठ बंदला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

विद्रुपीकरण करणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलिस बंदोबस्त तैनात...

पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घेतली विद्यार्थी संघटनांची बैठक विद्यापीठात शांतता राखण्याचे केले आवाहन...काल झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 

विद्यापीठाच्या परिसरात भिंतीवर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर विद्यापीठाने तक्रार देऊन तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज विविध आंबेडकरी संघटनांनी विद्यापीठ बंदची हाक दिली होती बंदच्या हाकेला प्रतिसाद देत उस्फुर्त पणे शेकडो विद्यार्थी बंद मध्ये सहभागी झाले होते.

सकाळी 11 वाजता रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, एमआयएम विद्यार्थी आघाडी, एनएसयुआय, प्रहार, सत्यशोधक, संशोधक विद्यार्थी कृती समिती, राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी विविध विभागात जाऊन विद्यार्थ्यांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले तर रिडींग रूम येथे द्वार सभा घेण्यात आली त्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले.

प्र. कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ यांची भेट घेऊन येत्या 2 दिवसात अभाविप च्या कार्यकर्त्यांविरोधात विद्यापीठ प्रशासनाने तक्रार द्यावी, व झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी, ठिकठिकाणचे बंद स्ट्रीट लाईट चालू करावे,अभाविपला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी केली.

बंद दरम्यान पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींना पोलीस आयुक्त कार्यालय येथे बोलावून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले यावेळी सहा. पोलीस आयुक्त मोरे, पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे यांची उपस्थिती होती.

 

आंदोलनात सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, राहुल वडमारे, डॉ.कुणाल खरात, ऍड.अतुल कांबळे, संदिप तुपसमुद्रे, निशिकांत कांबळे, सिद्धार्थ मोरे, जयपाल सुकाळे, अक्रम , भीमराव वाघमारे, नारायण खरात, अमित घनघाव, मनिषा बल्लाळ, प्रतीक बोरडे, भागवत चोपडे, मानव साळवे, दीक्षा पवार, विकास रोडे, अनिल दिपके, आदि बनसोडे, ब्रिजेश इंगळे, सिद्धार्थ पाणबुडे, विश्वजित गायकवाड, कुणाल भालेराव, योगेश बहादुरे, सादिक शेख, सुशील बोर्डे, प्रवीण वाव्हळ, शैलेंद्र म्हस्के, अमोल घुगे, श्री लटँगे, आदिसह शेकडो विद्यार्थी यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

काल झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन्ही गटावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आंबेडकरी विद्यार्थी संघटनेच्या सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, संदीप तुपसमिंद्रे, कुणाल खरात यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात कलम 143,147,149,323,504,506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल सामाजिक कार्यकर्ते अमित घनगाव यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात ॠषीकेश केकान, अभिषेक गावडे व इतर एबिव्हिपिच्या कार्यकर्त्यांविरुध्द कलम 295,323,504,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow