शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

 0
शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) शिक्षकांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाचे एन-1 सिडको येथील सेंट झेवियर्स शाळा या प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू आहे तरी मागणीकडे शाळा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्ते करत आहे.

प्रशालेतील श्रीमती करुणा सोरमारे(14 वर्ष सेवा), श्रीमती जयश्री पाटील(15 वर्ष सेवा) यांची नियमबाह्य सेवा समाप्ती आदेश तात्काळ रद्द करुन कर्मचाऱ्यांना प्रशालेत रुजू करावे. प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती कविता मोकळे यांना शाळेवर रुजू करून घ्यावे. त्यांचे थकीत वेतन फरकासह अदा करावे. प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शुभदा शेलार, श्रीमती पिंकी पिल्ले यांना शाळेवर रुजू करून थकीत वेतन द्यावे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य पद्धतीने केलेल्या वेतन कपातीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी. शिक्षक कर्मचारी यांच्या सेवा पुस्तिका अद्ययावत करुन द्यावी या मागणीसाठी शाळेसमोर उपोषण सुरू आहे.

निवेदनात भाई चंद्रकांत चव्हाण, विलास चांदणे, अजय कदम, नवनाथ मंत्री, अशोक ढमढेरे, विनोद केनेकर, विलास चव्हाण, मानसी भागवत, जयश्री पाटील, करुना सोनपसारे, कविता मोकळे, शुभदा शेलार, पिंकी पिल्लई यांची नावे आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow