शाहू महाराज जयंती व अँटी ड्रग डे निमित्त अधिक्षक सचिन पाटीलांनी विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

 0
शाहू महाराज जयंती व अँटी ड्रग डे निमित्त अधिक्षक सचिन पाटीलांनी विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

शाहू महाराज जयंती आणि अँटी ड्रग डे निमित्त अधीक्षक सचिन पाटीलांनी विद्यार्थ्यांना दिला हा मोलाचा सल्ला !

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.27(डि-24 न्यूज) बनसोडे नगर, मिसारवाडी येथील बोधी प्राथमिक विद्यालय व सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल येथे छ. संभाजीनगर गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी अँटी ड्रग डे आणि शाहू महाराज जयंती विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाची सुरूवात सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पुतळ्याला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व वंदन करुन करण्यात आली. 

सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दीपक बनसोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचा सत्कार केला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. 

सचिन पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, अँटी ड्रग डे चे औचित्य साधून तंबाखू, मद्य, ड्रगचे सेवन करणार नाही असे मुलांकडून वदवून घेतले. तर सामाजिक न्याय दिनाची आठवण करून देत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' या ब्रीदवाक्याची आठवण करून दिली. तसेच, शाहू महाराज व ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे विचार सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “शिक्षण आणि संयम हाच यशाचा मार्ग आहे.” आपण सर्वांनी आपल्या जीवनात उच्च ध्येय निश्चित करायला हवे आणि त्यासाठी कठोर परिश्रम करायला हवेत. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गडगडात त्याचे स्वागत केले. तसेच, अँटी ड्रग डे च्या निमित्ताने आपण सर्वांनी नशापासून दूर राहण्याचा संकल्प करावा व भविष्यात विद्यार्थ्यांनी आपले, आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे असे ही आव्हान विद्यार्थ्यांना केले. 

यावेळी, विद्यार्थ्यांनी सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकले आणि त्यांनी दिलेला सल्ला आचरणात आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, महेंद्र काशीद यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान बनसोडे दीपक श्रीपतराव (अध्यक्ष सिद्धार्थ शिक्षण संस्था व सुभेदार रामजी आंबेडकर महाविद्यालय मुख्याध्याक) यांनी स्विकारले. तर आभार प्रदर्शन, श्रीमती मनोरमा तिजारे (सदस्य सिद्धार्थ शिक्षण संस्था व सुभेदार रामजी आंबेडकर महाविद्यालय) यांनी केले. यावेळी सह शिक्षक ओंकार मुखेकर, कालिदास काकुळते, विजय राठोड, संदीप बस्सयै, सह शिक्षिका हाश्मी हुमेरा, प्रेरणा वाहुळे, लिपीक भुजंग बागडे, सेवक संजय कांबळे, काकासाहेब शेजूळ, इम्रान शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

यावेळी सचिन पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांची

मने जिंकली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow