शहरात महा रोजगार मेळावा, एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनचा पुढाकार...

 0
शहरात महा रोजगार मेळावा, एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनचा पुढाकार...

शहरात महा रोजगार मेळावा, एन्डलेस हेल्पिंग फाऊंडेशनचा पुढाकार...

मराठवाड्यातील 2500 तरुणांना मिळणार रोजगार...

“रोजगार हेच आमचे ध्येय” एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन....

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)- बेरोजगारीच्या समस्येने अस्वस्थ झालेल्या तरुणाईला आता दिलासा मिळणार आहे. कारण एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन आणि MIT कॉलेज, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा रोजगार मेळावा आयोजित केला गेला आहे. या महा रोजगार मेळाव्याने मराठवाड्यातील 2500 युवकांना रोजगार मिळणार आहे जास्तीत जास्त तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे उपाध्यक्ष जाकेर पटेल यांनी केले आहे.

हा रोजगार मेळावा शनिवार, 4 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत एमआयटी कॉलेज कॅम्पस, बीड बायपासवरील मंथन हॉल येथे पार पडणार असून, विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट उमेदवारांची निवड करणार आहेत.

कोणकोणत्या क्षेत्रात संधी?

इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स

FMCG, टेलिकॉम, हॉस्पिटॅलिटी

BPO, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल

फार्मास्युटिकल, शो-रूम, मॉल्स

लॉजिस्टिक्स आणि इतर क्षेत्रे

एंट्री लेव्हल ते अनुभवी अशा सर्व पदांसाठी जागा उपलब्ध राहणार आहेत.

पात्रता निकष..

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी, बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., डिप्लोमा, डिग्री, बी.ई., IGTR, CIPET

फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार पात्र...

नोंदणी व संपर्क

संकेतस्थळ : www.endlesshelpingfoundation.org.in

ई-मेल : endlesshelpingfoundation@gmail.com / helplinendlessfoundation@gmail.com

हेल्पलाईन : 8055577751 / 8055577741

पत्रकार परिषदेतून संदेश

“एंडलेस हेल्पिंग फाउंडेशन हे केवळ रोजगारपुरते मर्यादित नाही. आरोग्य क्षेत्रात रुग्णांना मदत, शैक्षणिक उपक्रम, कृषी क्षेत्र व समाजासाठी सातत्याने सेवा हे आमचे ध्येय आहे. हा रोजगार मेळावा म्हणजे तरुणांना नव्या भविष्याकडे घेऊन जाणारा पूल आहे.”

या पत्रकार परिषदेत चार्टर्ड अकाऊंटंट फारुक पटेल, ॲड. हकीम पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांसाठी खुला रोजगार मेळावा

हा रोजगार मेळावा सर्व समाजघटकांसाठी खुला आहे. बेरोजगारीशी झुंजणाऱ्या तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

4 ऑक्टोबरला MIT कॉलेजचा मंथन हॉल तरुणाईच्या भविष्याचे नवे दालन ठरणार आहे! असे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow