बिनव्याजी कर्ज उपलब्ध केल्यास देशाचा जीडीपी वाढेल आणि शेतकरी आत्महत्या होणार नाही - मौलाना इलियास फलाही

 0
बिनव्याजी कर्ज उपलब्ध केल्यास देशाचा जीडीपी वाढेल आणि शेतकरी आत्महत्या होणार नाही - मौलाना इलियास फलाही

बिनव्याजी कर्ज उपलब्ध केल्यास देशाचा जीडीपी वाढेल आणि शेतकरी आत्महत्या होणार नाही - मौलाना इलियास फलाही

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज) -देशातील युवकांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास मोठ्या प्रमाणात असून सुद्धा बेरोजगारी वाढत असल्याने हि चिंतेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. व्यवसायात पिछेहाट झाली तर नैराश्य वाढत आहे. याला एकच कारण आहे व्याजाच्या कचाट्यात सापडल्याने प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीला खिळ बसत आहे. कर्जावर व्याजाची सवयीमुळे गरजू चिंतातूर होऊन याचा फटका देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर बसत आहे. देशात इस्लामिक बँकींगला प्रोत्साहन दिले तर देशाचा जिडीपी वाढेल व शेतकऱ्यांचे होणा-या आत्महत्या थांबतील. व्याजाचे चक्रात संभ्रम फैलावून विविध स्किम दाखवून गरीब गरीब होत आहे आणि श्रीमंत हा श्रीमंत होत असल्याने हि दरी कमी करण्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली तर देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. वर्ल्ड बँकेने डाटा देऊन सांगितले कि इस्लामिक बँकींगला प्रोत्साहन दिले तर जीडीपी वाढेल असे प्रतिपादन अल खैर बैतूल माल पतसंस्थेच्या 23 व्या सर्वसाधारण सभेत इस्लामिक स्काॅलर मौलाना इलियास फलाही यांनी केले.

हज हाऊस येथील सभागृहात शनिवारी सायंकाळी 7.30 वाजता अल खैर बैतूल माल नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या उपस्थितीत विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी अध्यक्षीय भाषणात मौलाना इलियास फलाही यांनी हे प्रतिपादन केले.

मागिल 22 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शाखा अल खैर बैतूल माल पतसंस्थेच्या माध्यमातून 27597 खातेदारांनी फायदा घेतला. या पतसंस्थेत एक टक्के सर्विस चार्ज घेऊन गरजूंना सोने तारण ठेवून गरजूंना कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. 16 हजार खातेदार आहे. एका महिन्यात जवळपास 500 गरजूंना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सर्व जाती धर्माच्या गरजूं याचा लाभ घेत आहेत. भविष्यात तीन ठिकाणी जटवाडा रोड, सईदा काॅलनी, पडेगाव व मिसारवाडी येथे नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बचत गटांना व्याजाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी कर्ज योजना, छोटे उद्योगधंदे वाढीसाठी कर्ज, वाहन कर्ज, हातगाडीवर व्यवसाय करणारे व मुस्लिम धर्मगुरु यांनाही बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. अल खैर बैतूल माल पतसंस्थेच्या नावाने सध्या ऑनलाईन फसवणूक सुरू आहे नागरीकांनी याबद्दल सतर्क राहावे. आमच्या शाखेचा व्यवहार सध्या ऑफलाईन आहे ऑनलाईन नाही. पुढील काळात ऑनलाईन बँकिंग सुरु करणार आहे. फसवणूक झाली तर यासाठी अल खैर बैतूल माल पतसंस्था जवाबदार राहणार नाही. अशी माहिती प्रस्तावनेत शाखेचे चेअरमन इंजि. वाजेद कादरी यांनी दिली.

जमात-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद जमीर कादरी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले इस्लामिक माॅडल समोर ठेवून व्यवसाय व अन्य क्षेत्रात देशातील नागरिकांनी इमानदारीने व्यवसाय उभा केला तर प्रगती कोणी रोखू शकत नाही यासाठी गरजूंना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात अल खैर बैतूल मालचे 16 पतसंस्थेच्या 19 शाखा सुरू आहे. भविष्यात या शाखा 40 करण्याचा मानस आहे. 730 कोटींचे खेळते भांडवल आहे. या विविध शाखेतून 27 हजार राज्यस्तरीय खातेदारांनी लाभ घेतला आहे. 128 कोटी रुपये कर्ज वाटप केले. कॅपिटल शेअर 20 कोटींचे आहे. 92 करोड रुपये खातेदारांनी आमच्या विविध शाखेत एफडी केले आहे. असे त्यांनी सांगितले. सुत्रसंचलन शेख नासेर पाशू यांनी केले.

व्यासपीठावर जमात-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष सलमान मुकर्रम सिद्दीकी, सुनील वाकेकर, पतसंस्थेचे सचिव नासेर जोहरी, संचालक अन्वर हुसेन, अब्दुल कवी फलाही, सलिम हाश्मी, कदीर खान, अ. जव्वाद कादरी, श्रीमती फहेमुन्निसा बेगम, शाकेरा खानम, मौलाना अब्दुल शिकुर, मौलाना डॉ.अब्दुल रशिद मदनी, शाईस्ता कादरी, शाखा व्यवस्थापक हाफिज हबीबुल्लाह, मोहम्मद अकबर, अहेमद मोहीयोद्दीन आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow