आरक्षणासाठी मुस्लिम समाज अक्रामक, सबका साथ सबका विकासची अंमलबजावणी करा...

 0
आरक्षणासाठी मुस्लिम समाज अक्रामक, सबका साथ सबका विकासची अंमलबजावणी करा...

आरक्षणासाठी मुस्लिम समाज अक्रामक, कोठे आहे सबका साथ सबका विकास...

मंत्रीमंडळ बैठकीत करणार घेराव...

औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) भाजपाचा सबका साथ सबका विकास नारा आहे. याची अंमलबजावणी करावी व मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आता मुस्लिम समाज अक्रामक होत आहे. मंत्रीमंडळ बैठकीला घेराव घालण्याचा इशारा मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करुन दिला आहे.

प्रत्येक राज्यात राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन करणे गरजेचे आहे. मुस्लिम आरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध कमिशन व कमेटी स्थापन केली. वारंवार आपल्या अहवालात आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली. शैक्षणिक, वसामाजिक आणि आर्थिक, राजकीय दृष्टीने मुस्लिम समाज मागास आहे. म्हणून तीनही क्षेत्रात आरक्षणाची अत्यंत आवश्यक आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने आपल्यावर जवाबदारी आहे सर्वांगीण विकास करण्याची म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ कायदा बणवून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शिक्षणात विद्यार्थ्यांना त्या आरक्षणाचा फायदा होईल. सबका साथ सबका विकास हे ब्रीद वाक्य पंतप्रधान यांचे आहे हे लक्षात घेऊन लवकर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा बणवावा व समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवून केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षण देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता त्याची अंमलबजावणी करावी. आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

निवेदनात माजी महापौर अब्दुल रशिद मामू, इलियास किरमानी, शोएब खुसरो, एड नवाब पटेल, नायाब अन्सारी, शारेक नक्शबंदी, मुश्ताक अहमद, हामद चाऊस, मुकीम देशमुख, अफसरखान, ख्वाजा शरफोद्दीन, मसूद शेख, एड खान सलिम खान, नासेर सिद्दीकी, नासेर नाहदी, मिर्झा सलिम बेग, एजाज जैदी, एड सुफीयान सिद्दीकी, अब्दुल रऊफ, अनिस पटेल, मोहंमद हबीब(मुन्ना), अब्दुल सत्तार खान, खालेद आफताब, मुफ्ती अन्वरुल हक, कमर साहेब, खुलताबाद, मन्सूर खान, अकील पटेल, फारुख शेख, डॉ.सोहेल जकीयोद्दीन, सय्यद अशफाक, जावेद पटेल, अजिम इन्कलाब, शेख मुख्तार, शेख जियाओद्दीन सर, अजहर पठाण, सय्यद नसिर, इरफान सर क्रीडा आयटी आदींची उपस्थिती हो

ती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow