मिटमिटा येथील प्रस्तावित झूलाॅजिकल पार्कमध्ये 3 हजार वृक्षारोपणाने वृक्षारोपण सप्ताहाची सांगता...!

 0
मिटमिटा येथील प्रस्तावित झूलाॅजिकल पार्कमध्ये 3 हजार वृक्षारोपणाने वृक्षारोपण सप्ताहाची सांगता...!

मिटमिटा येथील प्रस्तावित झूलॉजिकल पार्कमध्ये 3 हजार वृक्षारोपणाने वृक्षारोपण सप्ताहाची सांगता

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 30(डि-24 न्यूज)- हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण सप्ताहाची सांगता आज मिटमिटा येथील प्रस्तावित झूलॉजिकल पार्क परिसरात 3 हजार वृक्षारोपण करून करण्यात आली.

यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, गटनेते गणेश लोखंडे, नगरसेवक अब्दुल रशीद खान (मामू), मनपा आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य उद्यान अधिकारी डॉ. विजय पाटील, कार्यकारी अभियंता वसंत भोये, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हरित महाराष्ट्र आयोगाच्या संकल्पनेतून राज्यातील वनसंपदा व वृक्षाच्छादन वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे दि. 22 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता आज झूलॉजिकल पार्क परिसरात 3 हजार वृक्षांची लागवड करून करण्यात आली.

यावेळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व पालकमंत्री संजय शिरसाट यांना प्रस्तावित झूलॉजिकल पार्कच्या आराखड्याची, प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची तसेच सध्या सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. यावेळी पार्कच्या उभारणीसंदर्भातील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

मान्यवरांनी झूलॉजिकल पार्क हा शहराच्या पर्यावरणीय समतोलासह पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे सांगत वृक्षसंवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow