बजाजनगर, प्रियकराच्या पत्नीला संपवले, महीला आरोपी अटक...!
प्रियकराच्या पत्नीला संपविले;
चाकूने वार करीत निर्घृण हत्या
बजाजनगर हादरले : पिस्टलाने गोळी झाडल्याचीही चर्चा
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी
प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या प्रियकराच्या पत्नीची त्याच्याच प्रेयसीने निर्घृण हत्या केल्याची घटना वाळूज परिसरातील बजाजनगरात घडली. बुधवार 22 एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली अन एकच खळबळ उडाली. साधना महेंद्र सोनपेटकर (वय 40, राहणार साई श्रद्धा पार्क, वडगाव कोल्हाटी) असे मयत महिलेचे नाव आहे. तर आरोपी शैला सोनार (वय 45, राहणार बजाजनगर) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाळूज महानगर परिसर बुधवारी भयंकर खुनाच्या घटनेने हादरला. बजाजनगरातील साई श्रद्धा पार्कमध्ये एका 40 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अज्ञाताने दिली. पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथील चित्र अतिशय भयावह होते. हत्या झालेली महिला घरात पडलेली होती. तर सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. प्रथमदर्शनीच हल्लेखोराने अतिशय क्रुरपणे महिलेवर चाकूचे घाव घातल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता साधना सोनपेटकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या पोटात आणि गळ्यावर खोलवर जखमा होत्या. चाकूने भोसकून महिलेला ठार करण्यात आले होते. तर घटनास्थळी पिस्तूलही सापडल्याने आरोपी महिलेने पिस्तूलाचाही वापर केल्याची चर्चा परिसरात होती. त्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते.
आरोपी जेरबंद...
वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी महिलेला तातडीने अटक केली. शैला सोनार असे आरोपी महिलेचे नाव असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर महिलेने ज्या पद्धतीने हत्या केली त्यामुळे पोलिसही हादरून गेले होते. पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर हे घटनास्थळी दाखल झाले. मारेकरी महीलाही बंद खोलीत होती. दरवाजा तोडला असता एका महीलेचा रक्तबंबाळ अवस्थेत शव आढळून आला. काही अंतरावर पिस्टल दिसून आली. हा खून पिस्टलने करण्यात आला का हा तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
What's Your Reaction?