नांदेड स्नॅचिंग प्रकरणातील 2 आरोपी ताब्यात, छत्रपती संभाजीनगरात रेल्वे मालमत्ता चोरीत एकाला अटक...

 0
नांदेड स्नॅचिंग प्रकरणातील 2 आरोपी ताब्यात, छत्रपती संभाजीनगरात रेल्वे मालमत्ता चोरीत एकाला अटक...

नांदेडमध्ये स्नेचिंग प्रकरणातील दोन आरोपी ताब्यात; छत्रपती संभाजीनगरात रेल्वे मालमत्ता चोरीत एकाला अटक...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन रेल सुरक्षा आणि ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. नांदेड येथे उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रेल्वे मालमत्ता चोरी प्रकरणात कारवाई...

 छत्रपती संभाजीनगर येथे उपनिरीक्षक के. चंदुलाल, हेड कॉन्स्टेबल गणेश काळे आणि कॉन्स्टेबल रणजीत सिंग यांच्या पथकाने गुप्त पाहणीदरम्यान स्थानक यार्ड परिसरात संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव सनी (रा. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.

आरोपीने 22 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानक यार्डमधून सुमारे 30 मीटर कॅटेनरी वायर (तांबे) आणि 7.5 मीटर डिस्चार्ज केबल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून चोरीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी RPF पोस्ट, छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा क्रमांक 2/2026, RP(UP) कायदा 1966 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले असून पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नांदेडमध्ये स्नेचिंग प्रकरण उघड...

दरम्यान, नांदेड येथे RPF आणि GRP च्या संयुक्त पथकाने उच्च मूल्याच्या स्नेचिंग प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले. हा प्रकार 25/26 फेब्रुवारी 2026 च्या मध्यरात्री जयपूर–काचीगुडा स्पेशल एक्सप्रेस (क्रमांक 07054) मध्ये घडला होता.

या घटनेत एका महिला प्रवाशाची सुमारे 7.20 लाख रुपये किमतीची पर्स हिसकावण्यात आली होती. पर्समध्ये सुमारे 168 ग्रॅम सोन्याचे दागिने, हिरे तसेच 100 ग्रॅम चांदीच्या वस्तू होत्या.

1 एप्रिल रोजी सायंकाळी नांदेड रेल्वे स्थानकावर गुप्त कारवाईदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे श्रीकांत व शंकर (दोघेही रा. नांदेड) अशी सांगितली असून त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी GRP कार्यालयात नेण्यात आले असून चोरीचा माल जप्त करण्यासाठी तपास सुरू आहे. त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे पोलि

सांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow