शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह पर्यटन पूरक शास्वत कृषी पर्यटन केंद्र स्थापन करुन उद्योग व्यवसाय करावा - डॉ.शिवाजी गायकवाड
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसह पर्यटन पूरक शास्वत कृषी पर्यटन केंद्र स्थापन करुन उद्योग व्यवसाय करावा -डॉ.शिवाजी गायकवाड.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)- नुकत्याच झालेल्या गांधीली तालुका जिल्ह्यातील महात्मा गांधी मिशन अंतर्गत स्थापित कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी बीसीआय उद्यमी महिला शेतकरी महिला व हस्तय हस्त उद्योग करणाऱ्या महिला यांच्यासाठी आयोजित केलेल्या सूक्ष्म उद्योगावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभागाचे उपसंचालक श्री विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पर्यटन विभागाची कृषी पर्यटन योजना व महिला केंद्रित पर्यटन धोरण 2024 या अंतर्गत असलेली उद्योगी महिलांसाठीच्या सोयी सवलती बँक कर्ज आई योजना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र च्या संचालिका तथा शास्त्रज्ञ डॉक्टर वैशाली देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर घेण्यात आले. त्यात कृषी पर्यटन केंद्र आणि शेतकरी पूरक योजना या विषयावर महाराष्ट्र पर्यटन प्रादेशिक कार्यालय छत्रपती संभाजी नगर पर्यटन विभागाचे पर्यटन सहाय्यक डॉ. शिवाजी गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर आई पर्यटन धोरण अंतर्गत पर्यटन विभागाच्या प्रकल्प अधिकारी रंजना राठोड यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी बीसीआयचे अरुण कांबळे, उपजीविका तज्ञ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. वैशाली देशमुख यांनी केले. यावेळी गंगापूर तालुक्यातून आलेल्या उदयमी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या शिबिरात त्यांनी घरगुती उद्योगातून तयार केलेल्या खाद्य वस्तू, हस्तकला, पाककला या वस्तू तयार करून आणल्या होत्या येणारा काळ पर्यटन उद्योगाचा असणार आहे व या उद्योगात जास्तीत जास्त महिला व शेतकरी यांनी पारंपारिक शेती बरोबर पर्यटन पूरक व्यवसाय असलेला कृषी पर्यटन केंद्र स्थापन करून पारंपारिक शेतीसह शाश्वत पर्यटन उद्योग व्यवसायात पुढे येऊन आपला आर्थिक विकास करण्यावर जास्तीत जास्त भर द्यावा असे प्रतिपादन केले.
What's Your Reaction?