शहरात काँग्रेस झाली एक्टिव्ह, तयारी विधानसभेची...!
शहरात काँग्रेस झाली एक्टीव्ह, तयारी विधानसभेची...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.14(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. काँग्रेस एक नंबर पक्ष म्हणून उदयास आला आहे. राज्यात काँग्रेसचे 14 खासदार निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. काही महीन्यात विधानसभेची निवडणूक असल्याने इच्छूक आतापासूनच तयारीला लागले असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस एक्टिव्ह मोडवर दिसून येत आहे. शहर नशा मुक्त करण्यासाठी अभियान प्रसिद्ध डॉक्टर तथा काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ.सरताज पठाण यांनी शहरात होर्डिंग्ज लाऊन कामाला सुरुवात केली आहे. शहरातील वार्डात नशा मुक्त अभियान घेण्यासाठी ते नियोजन करत असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून डॉ.सरताज पठाण यांची ओळख आहे. प्रसिध्दीच्या झोतात न राहता त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. परंतु औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात त्यांचे होर्डिंग्ज लागल्याने शहरात चर्चा सुरू झाली आहे ते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या बॅनरवर पंजा, "नेता नहीं बेटा आया है" नशामुक्त अभियान, "मेरा शहर मेरा गुरुर" असा मजकूर लिहिलेला आहे. अण्णाभाऊ साठे चौक, चंपाचौक, कटकट गेट, नेहरुनगर भागात हे होर्डिंग्ज व बॅनर लागले आहे. त्यांच्या वडीलांपासून त्यांचे कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले आहे. परंतु महाविकास आघाडीने हि निवडणूक एकत्र लढली तर जागा कोणत्या पक्षाला सुटेल हा प्रश्न आहे. पण शहरात काँग्रेस एक्टिव्ह मोडवर आली आणि लोकसभा निवडणुकीत यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असे यावरुन दिसून येत आहे
What's Your Reaction?