उमेश पुरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल, टिव्ही डिबेट मध्ये केले विवादित वक्तव्य

उमेश पुरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल, टिव्ही डिबेट मध्ये केले विवादित वक्तव्य
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) एका टिव्हि डिबेट मध्ये उत्तर प्रदेशचे उमेश पुरी महाराज यांनी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात कथित वक्तव्या केल्याने सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया(एसडिपिआई) अक्रामक झाली आहे.
औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात एसडिपिआईच्या वतीने लेखी तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार एसडिपिआईचे जिल्हा महासचिव मोहसिन खान यांच्या तक्रारीवरुन उमेश पुरी महाराज यांच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात कलम 299, 353(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसडिपिआईने तात्काळ उमेश पुरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या विवादित वक्तव्याने विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष समीर शाह, महासचिव मोहसिन खान, जिल्हा सचिव साकी अहेमद, कोषाध्यक्ष हाफीज समीउल्लाह काजी, अशरफ पठाण, आरेफ शाह, रियाज सौदागर, जुबैर लाला आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






