इम्तियाज जलिल खालच्या दर्जाचे राजकारणी - सपा नेते परवेझ सिद्दीकी

 0
इम्तियाज जलिल खालच्या दर्जाचे राजकारणी - सपा नेते परवेझ सिद्दीकी

इम्तियाज हे खालच्या दर्जाचे

राजकारणी - परवेज सिद्दिकी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु असिम आझमी यांचे राज्यातील राजकारणात व समाजकारणात मोठे योगदान आहे हे जनतेला माहित आहे. इम्तियाज जलिल आता राजकारणात आले आहे. आझमींच्या विरोधात वक्तव्य करण्याची त्यांची राजकारणात उंची नाही ते नाचणारे एक कलाकार आहे म्हणुन आझमींनी त्यांच्या टिकेला उत्तर दिले नाही आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना उत्तर देण्यास सक्षम आहे अशी जहरी टिका सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेझ सिद्दीकी यांनी केली आहे.

 पुढे बोलताना त्यांनी सांगितले समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांच्याविरोधात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ‘दलाल’ शब्द वापरून स्वतःचा आणि स्वतःच्या राजकारणाचा दर्जा दाखवून दिला आहे. जलील हे खालच्या दर्जाचे राजकारणी असून ते एक कलाकार आहेत. त्यांच्या पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत ज्यांनी रिक्षा विकून प्रचार केला त्यांना घर मिळाले की नाही परंतु इम्तियाज जलिल यांनी "मन्नत" बंगला बांधून घेतला अशी खोचक टीका समाजवादी पक्षाचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दिकी यांनी केली.

सिद्दिकी यांनी बुधवारी (ता.४) पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना. पुढे ते म्हणाले, की भाजपचा आयटी सेल हा एमआयएमचा आयटी सेल चालवतो. हे पक्ष देशात अशांतता पसरवत जनतेला धोका देत आहेत, परंतु समाजवादी पार्टी देशातील सर्व समाजाला एकत्रित करत अखंडतेसाठी काम करतो. मुंबईत झालेल्या आंदोलनामध्ये अबू आजमींच्या विरोधात जलील यांनी टीका केली, यामुळे जलील हे कोणत्या पातळीचे नेते आहेत दिसून येते, तसेच येणाऱ्या समाजवादी पार्टी महापालिका निवडणुका लढवणार असून यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींना स्थान देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी नविन पदाधिका-यांची निवड करण्यासाठी शहरात कोअर कमेटीची बैठक घेतली.

 पत्रकार परिषदेला प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ, अकील शेख, रियाजोद्दीन देशमुख, आयुब खान, अयुब पटेल, शेख अब्दुल रफिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow