मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे "मिशन औरंगाबाद सुरू, सर्वोच्च न्यायालयात हिशाम उस्मानी यांच्या याचिकेला समर्थन

 0
मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे "मिशन औरंगाबाद सुरू, सर्वोच्च न्यायालयात हिशाम उस्मानी यांच्या याचिकेला समर्थन

मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे "मिशन औरंगाबाद सुरू, सर्वोच्च न्यायालयात हिशाम उस्मानी यांच्या याचिकेला समर्थन

मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाचे मुख्य याचिकाकर्ते तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष मुश्ताक अहमद, काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांची दांडी, मोहम्मद हिशाम उस्मानी यांची एकमेव याचिका दाखल करण्यास पाठींबा देण्यावर एकमत...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6(डि-24 न्यूज) औरंगाबाद नामांतर विरोधात सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद हिशाम उस्मानी हे याचिका दाखल करणार आहे त्यांना पाठिंबा देण्याचा ठराव एकमताने मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या कार्यक्रमात घेण्यात आला. यावेळी काही ठराव हात उंचावून मंजूर करण्यात आले यामध्ये राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहिरनाम्यात उल्लेख करावा की ऐतिहासिक औरंगाबाद जशाच्या तशे ठेवण्यासाठी निर्णय बदलणार. ज्या पक्षांनी नामांतरावर भुमिका बदलली नाही तर समाज साथ देणार नाही. छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव वाळूज व परिसरातील भागात देण्यात यावे अथवा पुणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची कर्मभूमी राहिलेली आहे तेथे देण्यात यावे. दुकाने अथवा खाजगी कार्यालयावर ठळकपणे "औरंगाबाद" लिहावे. धार्मिक भावनेतून ऐतिहासिक औरंगाबादचे नामांतर राजकीय हेतूने बदलण्यात आले यामुळे समाजात नाराजी आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना नवीन नाव पटलेले नाही. जागतिक स्तरावर पर्यटन वाढीसाठी ऐतिहासिक औरंगाबादचे नाव परिचित आहे. यामुळे औरंगाबाद नाव वाचवण्यासाठी लोकचळवळ व न्यायालयिन लढाई सुरू ठेवण्यासाठी "मिशन औरंगाबाद" सुरू केल्याचे मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाऊद्दीन सिद्दीकी यांनी काल मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले.

या कार्यक्रमात याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी मोठा खुलासा केला की काँग्रेसच्या शहराध्यक्ष पद नामांतराच्या निर्णयानंतर राजिनामा दिल्यानंतर ऑफर देण्यात आली की नामांतर विरोधात बोलू नका तुम्हाला एमएलसी व विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल हि ऑफर धुडकावून नामांतराचा लढा सुरू केला. मुंबई उच्च न्यायालयात यश मिळाले नाही सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल. औरंगाबादचे नाव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. न्यायालयीन लढाईत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना(उबाठा) या पक्षाची मदत घेणार नाही.

यावेळी शिवसेना(उबाठा) गटाचे डॉ.शोएब हाश्मी, एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी, महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमेटीचे अध्यक्ष इलियास किरमानी, समाजवादी पक्षाचे अब्दुल रऊफ, वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सचिव तय्यब जफर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे सलिम पटेल वाहेगांवकर, एसडीपिआयचे जब्बार खान, संजय वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त करत औरंगाबादचे नाव वाचवण्यासाठी चळवळीत सहभागी होण्याचा संकल्प व्यक्त केला. मोहंमद मेराज सिद्दीकी यांनी सुत्रसंचालन केले. न्यायालयीन लढाईत मदत करायची व राजकीय पक्षांवर दबावगट निर्माण करावा व सर्व जाती धर्मातील लोकांना विश्वासात

सोबत घ्यावे यावर एकमत झाले. विधानसभेत अल्पसंख्याक समाजातील जास्त आमदार प्रश्न उपस्थित करण्यासाठी निवडून द्यावे लागतील असे मत डॉ.शोएब हाश्मी यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर मौलाना मोहंमद शरीफ निजामी, एड फैज सय्यद, मौलाना अनवरुल ईशाअती, अब्दुल मोईद हशर, मोहम्मद कामरान अली खान, सलिम सिद्दीकी, मन्नान खान आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow