छावणी श्री गणेश महासंघाच्या आखाड्यात अल्ताफ शेखने गाजवले मैदान...

 0
छावणी श्री गणेश महासंघाच्या आखाड्यात अल्ताफ शेखने गाजवले मैदान...

पैलवानांनी रंगवली छावणी श्री गणेश महासंघाच्या कुस्त्यांची दंगल...

पैलवान अल्ताफ शेख ठरला 11 हजार रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.5(डि-24 न्यूज) - छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मैदानी कुस्त्यांची भव्य दंगल गुरुवारी (दि.4) बास्केट बॉल मैदानावरघेण्यात आली. या कुस्ती स्पर्धेचे उदघाटन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते श्री हनुमानच्या पूजनाने करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या पैलवांनानी यावेळी एकमेकांना चितपट करत कुस्त्यांची दंगल रंगवली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे यांनी स्वागत केले. हरियाणाच्या नवीन मोर या पैलवानाला चितपट करत पैलवान अल्ताफ शेख 11 हजार रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. 

ऐकमेकांवर मात करत, धुळ चाटविणारे डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने लक्षवेधी ठरलेला छावणी श्री गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा आखाडा मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मल्लांनी यावर्षी रंगवला. सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे शहरातील विविध मल्लांची या कुस्ती स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती होती. दहा रुपया पासून तर 11 हजार रुपयांच्या बक्षीसांची कुस्ती विविध पैलवानमध्ये लावण्यात आली. यावेळी कुस्ती दरम्यान खासदार डॉ. भागवत कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. राधाकिसन पठाडे, महासंघाचे मुख्य मार्गदर्शक अशोक सायन्ना यादव, कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, मिलिंद दाभाडे, अमित भुईंगळ, अरुण बोर्डे, जालिंदर शेंडगे, लक्ष्मण शिंदे, प्रशांत तारगे, करण सिंह काकस, किशोर कच्छवाह, दिगंबर पौळ, एम. ए. अझर, राहुल यल्दी, विनोद साबळे, पुरुषोत्तम ठाकूर, दादाराव शेजवळ, राहुल शिरसाठ, गोकुळ भुजबळ, संजय धर्मरक्षक, बाबा बिल्डर, जाकीर पटेल, नाजिया पटेल, संजय पेरकर, संतोष जाधव, मजीद उल्ला बरकत उल्ला, भरत यादव, नारायण सुरे, विजय चौधरी, दीपक क्षीरसागर, नितेशसिंह सूर्यवंशी, ईश्वर गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण मराठवाड्यातून या कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी पैलवानांनी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावली होती. यामध्ये पैलवान सरवर पटेल, जब्बार पटेल, नवाब दादामियाँ शहा, गणेश महालकर, प्रेमराज डोंगरे, कडुबाळ चोपडे, सत्तार पटेल, गोपीनाथ बागडे, रामचंद्र बागडे, मजनू पटेल, राजू गायवाड, संजय भोणे, दत्तू दांडगे यांची उपस्थिती होती. कुस्ती स्पर्धेस उस्ताद डॉ. हंसराज डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. तर पंच म्हणून प्रा. मंगेश डोंगरे, रामेश्वर विधाते, सोमनाथ बखले, प्रवीण कडपे, पै. विष्णु गायकवाड, भगवान चित्रक, हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, मुख्तार पटेल, नवनाथ औताडे, इद्रीस खान, अशोक गायकवाड, अविनाश पवार, संदेश डोंगरे यांनी काम पाहिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow