स्केटींगमध्ये शेख जैदची चमकदार कामगिरी, गोव्यात स्पर्धेत सहभागी होऊन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

 0
स्केटींगमध्ये शेख जैदची चमकदार कामगिरी, गोव्यात स्पर्धेत सहभागी होऊन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी

41 व्या राज्यस्तरीय रोलर रिले शांती स्केटिंग मध्ये औरंगाबादच्या शेख जैदची चमकदार कामगिरी...!

ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग स्पर्धा गोवा साठी महाराष्ट्र संघात पात्र

औरंगाबाद,दि.22(डि-24 न्यूज) रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ आैरंगाबादच्या माध्यमातून 41 व्या राज्यस्तरीय रोलर रिले शांती स्केटिंग चषक स्पर्धा रविवारी विभागीय क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत औरंगाबाद च्या छावनी परिसर येथील होली क्रॉस इंग्रजी शाळेचा पाचवीचा विद्यार्थी शेख जैद जफर याने रिले स्केटिंग मध्ये चमकदार कामगिरी करत रजत पदक पटकावला. चमकदार कामगिरी केल्याने त्याची ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग स्पर्धा गोवा साठी महाराष्ट्र संघात पात्र झाला आहे. शेख जैद दैनिक भास्करचे वरिष्ठ क्राईम रिपोर्टर शेख जफर यांचा मुलगा व सेवानिवृत्त पुलिस अधिकारी शेख कैसर बाबाचा नातु आहे. महाराष्ट्र टीम मध्ये पात्र झाल्या वर जैदला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. जैद आंतरराष्ट्रीय स्केटर साई अंबेच्या मार्गदर्शनखाली सराव करत आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील जालना, नाशिक, परभणी, नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, पुणे, बीड, वाशिम, जळगाव,मुंबई व औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे उद्घाटन रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव भिकन अंबे, प्रसन्न काळे, देवगिरी कॉलेज प्रोफेसर अतुल काकडे, पी एस आय आत्माराम घुगे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी प्रशांत पुजारी, राधिका अंबे, सूर्यकांत डहाळे, आनंद मोरे, गणेश बनसोडे, प्रदीप पाटोळे, नाझिया मिर्झा, वैभव गिरी, राहुल खंडागळे, शांतनू रेणापूरकर, अमर लोंढे, रवी लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धे दरम्यान साई अंबे यांनी सूत्र संचालन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुजा अंबे, पूजा काबरा, प्रवीण जैस्वाल, प्रदिप बडगुजर, नांदिता कुलकर्णी, संतोष धनकर आदीप्रयत्नशील आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow