तनिषा बोरामणीकर हिचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले कौतुक

 0
तनिषा बोरामणीकर हिचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले कौतुक

तनिषा बोरामणीकर हिचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले कौतुक

औरंगाबाद दि.22(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२वी परीक्षेत येथील तनिषा सागर बोरामणीकर ह्या विद्यार्थिनीने 600 पैकी 600 गुण मिळवले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात तिचा सत्कार करून कौतुक केले.तिचे आई-वडील तसेच शिक्षण अधिकारी (माध्यमिक) मधुकर देशमुख, देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड व तिचे शिक्षक उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तनिषाने म्हणाली की, मला सनदी लेखापाल व्हावयाचे असून त्यासोबत यूपीएससीच्या परीक्षेचाही अभ्यास करणार आहे . जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी तनिषा बोरामानीकर हिचे कौतुक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow