अपर तहसीलदार विजय चव्हाण यांचे निलंबन मागे...!
अपर तहसीलदार विजय चव्हाण यांचे निलंबन मागे
औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) अब्दीमंडी विवादीत जमिन व्यवहार प्रकरणात निलंबित झालेले अपर तहसीलदार विजय चव्हाण यांचे निलंबन महसूल व वन विभागाने पुढील चौकशीसाठी मागे घेतले आहे. आदेशात त्यांना अपर तहसीलदार पदी रुजू होण्याचे आदेश निघाले आहे.
आदेशात म्हटले आहे अब्दिमंडी येथील गट नं.11,12,26,37, व 42 मधील जमीनी प्रकरणी संदर्भाधीन निलंबन आदेशामध्ये नमूद कारणास्तव शासन सेवेतून निलंबित केले आहे. याबाबत प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या समोरील मूळ अर्ज क्रं.581/2024 वरील न्यायाधिकरणाचे दि.19/3/2024 रोजीचे अंतरीम आदेश तसेच सदर आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी 23/4/2024 अन्वय निलंबन संपुष्टात आणण्याकरीता अहवाल सादर केला आहे.
अब्दीमंडी मधील मूळ संचिका सद्यस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा असून तहसील कार्यालय स्तरावरील अभिलेख कक्ष हा तहसीलदार(ग्रामीण) यांच्या अखत्यारीत आहे. यास्तव प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे निर्देश विचारात घेता पुढील आदेश होईपर्यंत विजय चव्हाण, अपर तहसीलदार यांना पुर्नस्थापित करण्यासाठी विभागीय चौकशीच्या अधिन राहुन दि.12/3/2024 रोजीच्या निलंबन आदेशास स्थगिती देण्यात येत आहे. त्यांनी आपल्या पदावर रुजू करून घेण्यात यावे असे आदेश कक्ष अधिकारी प्रगती विचारे यांच्या सहीने काढले आहे.
What's Your Reaction?