न्यायालयातील पार्कींग आणि झाड वाचवायला वकील सरसावले
न्यायालयातील पार्कींग आणि झाड वाचवायला वकील सरसावले ! औरंगाबाद दि.15(डि-24 न्यूज) जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीतील पार्कींग बंद करुन तेथे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिशांसाठी बंगले बांधण्यास विरोध करण्यासाठी पार्कींग व झाड बचाव कृती समितीने आवाहन केल्याप्रमाणे सोमवारी दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी 12.30 वाजता समिती तर्फे मुक निदर्शनेही करण्यात येणार आहेत. याबाबत असे की, जुन्या उच्च न्यायालयाच्या इमारतीतील पार्कींग बंद करुन तेथे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधिशांसाठी बंगले बांधण्यास वकीलांचा विरोध करण्यासाठी न्यायालयातील पार्कींग व झाड बचाव कृती समितीने आवाहन केल्या प्रमाणे वकील मोठ्या संख्येने पार्कींगच्या जागेवर जमा झाले होते , पार्कींग बंद करण्यास व झाड तोडण्यास विरोध असल्याबाबतचे पार्कींगच्या ठीकाणी बॅनर लावुन सविनय विरोध दर्शविला. यावेळी कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाही. पार्कींगच्या जागेवर कुंपण लावल्याने उर्वरीत परिसरात गाड्यांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने, आरोपींना घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनलाही न्यायालय परिसरात येता येत नाही, परिसरात वाहनांची एवढी गर्दी असते की, परिसरात आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन वाहन कींवा रुग्नवाहीका देखील आत येऊ शकणार नाही, बाहेर रस्त्यावर वाहन पार्क करावी लागत आहेत व वाहतुक पोलीस फोटो काढुन दंड लावत आहेत, जागेची कमतरता असतांना व कोटला काॅलनी येथे सर्व न्यायाधीशांसाठी निवासी वसाहत होणार असतांना उच्च न्यायालय या इमारतीत होते तेव्हापासुनच्या पार्कींगच्या जागेतच बंगले बांधण्याची कल्पना कोणाची याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच पार्कींगमध्ये पक्षकारांसाठी प्रसाधन गृह देखील आहे ते देखील बंद करण्यात आले. या इमारतीत विविध 14 न्यायालये व अनेक कार्यालये आहेत. ही इमारत केवळ कौटुंबिक न्यायालयाची नाही. या इमारतीच्या दुसर्या बाजुला गरजेपेक्षा जास्त जागा कौटुंबिक न्यायालयाला दिलेली असतांना न्यायालयाच्या दर्शनी भागात व पार्कींगच्या जागेत बंगले बांधु नये याबाबत मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन माननीय प्रशासकीय प्रमुख न्यायमर्ती, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद व पालक न्यायमुर्ती औद्योगिक व कामगार न्यायालये, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांना निवेदने पाठविण्यात आली होती. त्यानंतर न्यायमुर्ती रविंद्र घुगे व न्यायमुर्ती वाय जी खोब्रागडे साहेबांनी स्वतः येऊन पाहणी देखील केली होती. पुन्हा बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतरही झाड तोडण्यासाठी येणार असल्याचे कळाल्याने व जागेवर बांधकामासाठीचे लोखंड आणुन ठेवल्याने आज वकील मोठ्या संख्येने विरोध करण्यासाठी जमा झाले. परंतु आज झाड तोडण्यासाठी कोणी आले नाही, दोन दिवसाच्या सुट्टीचा गैरफायदा घेऊन झाड तोडतील म्हणुन वकीलांनी विरोधाचे बॅनर त्याठीकाणी चिटकवले. येथुन पुढचे आंदोलनासाठी मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल लाॅयर्स, जिल्हा वकील संघ, अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद या विविध संघटनांची कृती समिती तयार झाली असुन त्यास जुने उच्च न्यायालय पार्कींग व झाडे बचाव कृती समीती स्थापन करण्यात आली असुन सोमवार दि. 16 ऑक्टोबर 023 रोजी दुपारी 12.30 वाजता पार्कींगच्या जागेवर वकील जमा होऊन शांतपणे उभे राहुन झाडे तोडण्यास व पार्कींगच्या जागेत बंगले बांधण्यास सविनय नम्र विरोध दर्शविणार आहेत. चर्चेसाठी न्यायमुर्तींची वेळ देखील मागीतली जाणार आहे. सोमवारी दि. 16 ऑक्टोबर 023 रोजी दुपारी 12.30 वाजता जास्तीत जास्त वकील बंधु भगिनींनी जुने ऊच्च न्यायालयाच्या पार्कींगमध्ये झाड व पार्कींग वाचवण्यासाठी जमा व्हावे असे आवाहन मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष अॅड गंगाधर गाडीवान, सचिव अॅड अभय टाकसाळ, कोषाध्यक्ष अॅड राजेश खंडेलवाल, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड सतिष पाटील मुंडवाडकर,सचिव ॲड सदानंद किसनराव सोनुने, बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल लाॅयर्स चे अध्यक्ष अॅड राजाराम मुळे, सचिव अॅड युगांत मर्लापल्ले, उपाध्यक्ष अॅड विनोद पवार, अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबादचे अध्यक्ष अॅड डी टी देवणे, सचिव अॅड काकासाहेब जाधव यांच्या सह सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
What's Your Reaction?