आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, आरोग्य सेवेवर परिणाम...!

 0
आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, आरोग्य सेवेवर परिणाम...!

आयुष्यमान भारत, महात्मा फुले योजनेचे आरोग्य मित्र बेमुदत संपावर, आरोग्य सेवेवर परिणाम...!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील हजारो आरोग्य मित्र बेमुदत संपावर गेल्याने आरोग्य सेवेवर या संपाचा परिणाम दिसून येत आहे. आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. 

सी.आय.टी.यु.संलग्ण असलेल्या आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेने दिनांक 18 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर बेमुदत कामबंद आंदोलनाचे पत्र प्रसारीत केले होते. आरोग्य मित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सेक्रेटरी किरण ढमढेरे यांनी एम.आर.टी.यू. आणि पी.यू.एल.पी. कायद्याचे कलम 24(1) मधील तरतुदीनुसार 12 फेब्रुवारी पासून सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती डॉ.कराड यांनी दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटीला आणि सहाय्य संस्थाना कायदेशीर 21 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मागणी मान्य झाली नाही तर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. अगोदर बेमुदत संप 23 ऑगस्ट रोजी करण्यात आला होता पगारवाढ व इतर समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली तरीही मागणीवर विचार केला गेला नसल्याने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. 

आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार 26 हजार रुपये स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता मिळावा. दरवर्षी वेतन दहा टक्के पगारवाढ व्हावी. आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावे. कायदेशीर रजा मिळावी. बदलिंचे धोरण रद्द करावे. आरोग्य मित्र रमेश पंडित बैसाणे आणि गणेश अशोक शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करावे. आरोग्य मित्रांना सहाय्य संस्थेने पाच वर्षांपेक्षा जास्त नोकरी होऊन पण उपदान दिले नाही ते देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

धरणे आंदोलनाला काॅ.विजय, काॅ.गोरखनाथ, काॅ.मंगल ठोंबरे, अध्यक्ष प्रभाकर सपकाळ, उपाध्यक्ष शेख एजाज, राजेश पारखे, सागर पाटील, शेख मुस्तफिज, संघर्ष कवडे, संदीप काचगुंडे, आनंद प्रधान, शैलेश जाधव, आसिफ मुसा, अजय साखरे, अनिकेत पाईकराव, शेख अखलाक यांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow