फलटणच्या डाॅक्टर महीलेला न्याय मिळवून देण्यासाठी एनएसयुआयचे आंदोलन
फलटणच्या डाॅक्टर महीलेला न्याय मिळवून देण्यासाठी एनएसयूआयचा आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)- एनएसयूआय तर्फे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महीला डाॅक्टरला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन एनएसयुआयचे शहराध्यक्ष अभिषेक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शादाब अब्दुल रहमान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
या प्रसंगी सुमेध गायकवाड, अयान पटेल, सृजन गावंडे, नझिम खान, अजाज शेख, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?