क्रांती दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

 0
क्रांती दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

क्रांती दिनानिमित्त महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- क्रांती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यानंतर संभाजी पेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना, मिल कॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच टप्पा क्रमांक तीन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर विश्वभारती कॉलनी येथील भारत माता मंदिरात भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बुरांडे, प्रभाग समिती सभापती अनिता मानकापे, नगरसेवक चंद्रकांत हिवराळे, नगरसेविका कीर्ती शिंदे, अर्चना नीलकंठ, नगरसेवक नवीन ओबेरॉय, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य उद्यान अधिकारी डॉ. विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील सर्व प्रभागांमध्येही अभिवादन...

क्रांती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमध्येही संबंधित नगरसेवक तसेच महानगरपालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या पुतळ्यांना व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विविध ठिकाणी आयोजित या कार्यक्रमांद्वारे क्रांती दिन उत्साहात साजरा क

रण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow