उपवर्गीकरणाचा घाट घालणा-या सरकारला मतपेटीतून धडा शिकवा - लक्ष्मण भुतकर
उपवर्गीकरणाचा घाट घालणाऱ्या सरकारला मतपेटीतून धडा शिकवा -लक्ष्मण भुतकर
भारतीय दलित पॅंथरचा राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा उत्साहात, पंतप्रधान व संघावर एका वक्त्याने एकेरी भाषेत टिका केल्याने प्रभाग क्रमांक 8 च्या भाजपाच्या नगरसेविका भारती महेंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला... यानंतर काही महीला कार्यकर्त्या सभागृहाबाहेर पडल्याने सर्व अवाक झाले.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)- राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार अनुसूचित जाती आरक्षण व उपवर्गीकरणाच्या आडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या या सरकारला मतपेटीतून धडा शिकवा असे आवाहन पॅंथर नेते तथा भारतीय दलित पॅंथरच्या संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण भुतकर यांनी केले.
भारतीय दलित पॅंथरच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा आज रविवारी आंबेडकर नगरातील महात्मा फुले हॉल येथे पार पडला अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक प्रकाश सोनवणे, भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सोनकांबळे, प्राचार्य सुनील वाकेकर, सत्कारमूर्ती एकनाथ त्रिभुवन, मराठवाडा अध्यक्ष एजाज खान, स्वागत अध्यक्ष सिद्धार्थ गवई, राजकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री भुतकर म्हणाले पालकमंत्री संजय शिरसाठ आणि मंत्री अतुल सावे यांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले होते परंतु या मेळाव्याकडे त्यांनी पाठ फिरवली श्री शिरसाठ यांना भारतीय दलित पॅंथर भरभरून मतदान करून निवडून आणले समाजाचे असूनही त्यांना त्याची जाण नाही. भारतीय दलित पॅंथर सोबत पंगा घेतला तर त्यांना आपली ताकद दाखवण्याची हिंमत पॅंथर मध्ये आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या आडून राज्यातील सरकार दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे. परंतु त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू, दलित समाज त्यांना निवडणुकीमध्ये हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी भारतीय दलित पॅंथरची स्थापना झाली. सत्तावीस वर्षां पासून संघटना दलितावरून होणाऱ्या अन्याय अत्याचार दूर करीत आली आहे. यापुढेही हे काम पॅंथर अविरत चालू ठेवेल असे सांगून श्री भुतकर म्हणाले. 12 ऑगस्ट 2026 रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चामध्ये दलित पँथर पूर्ण ताकतीने सहभागी होईल असेही ते म्हणाले. यावेळी प्रा.प्रकाश सोनवणे, निवृत्ती सोनकांबळे, प्राचार्य सुनील वाकेकर यांचे भाषण झाले. यावेळी उदगीरचे नगरसेवक निवृत्ती सोनकांबळे यांनी 27 ठरावाचे वाचन केले. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्यात येऊ नये. तसेच एक सदस्य बदर समितीचा अहवाल रद्द करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, हर्सूल टी पॉइंट येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात यावी यासह अनेक महत्त्वाचा ठरावाचा या मध्ये समावेश आहे. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पहार व शाल घालून स्वागत केले. मेळाव्याच्या सुरुवातीला प्रख्यात गायिका कडूबाई खरात भीम यांनी बहरदार भीमगित सादर करत सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमात वैजापूर पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ त्रिभुवन, प्रख्यात भीम गायिका कडूबाई खरात यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस कांबळे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे, अमोल भुतकर, जालना जिल्हाध्यक्ष सत्तार पटेल, ॲड. कैलास पवार, गणेश खरात, परभणी जिल्हाध्यक्ष बाबाराव घुगे, गीताबाई मस्के, दैवशाली घेणे, सतीश राऊत, कपिल मोरे, नामदेव खरात, संजय सरोदे, समाधान कस्तुरे, ऋत्विक भुतकर, शरीफ लाला, सय्यद हबीब, शेख मोहसीन, खंडेराव साळवे, आकाश वाकळे, गौतम इंगोले, देविदास जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यभरातील भारतीय दलित पॅंथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?