घाटी रुग्णालय परिसरातील वक्फ संपत्ती वरील अनधिकृत काम एमआयएमने रोखले...
एमआयएमचा घाटी परिसरातील वक्फ संपत्तीवरील कथित अनधिकृत बांधकामाला विरोध; एमआयएम शहराध्यक्षांनी काम रोखले
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 19 (डि-24 न्यूज) – घाटी रुग्णालय परिसरातील वक्फ संस्थेची मशीद मुन्शी अमीनोद्दीन व कब्रस्तानाच्या जमिनीवर सुरू असलेले कथित अनधिकृत बांधकाम एमआयएम शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी रोखले. येथे मस्जिद परिसरात काम सुरू असल्याची माहिती एमआयएम टीमला मिळाली त्यांनी मस्जिद दर्गा कमेटीकडून माहिती घेतली त्यानंतर अनधिकृत काम रोखले. यावेळी शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी घाटी प्रशासनावर आरोप केला की मस्जिदच्या परिसरात काम सुरू केले होते. मस्जिद कमेटीकडे सर्व वक्फ बोर्डाचे जुने कागदपत्रे, गॅझेट आहे तरी पण अनधिकृतपणे काम करत आहेत ते आम्ही रोखले एक इंच पण जागा मस्जिदची घेवू देणार नाही असा पवित्रा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांची शिष्टमंडळ भेट घेऊन निवेदन देणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या 1973 च्या राजपत्रात नोंद असलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात MSBW/ABD/182/2010 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या सुमारे 38 हजार 250 चौरस फूट वक्फ संपत्तीवर जुन्या दिवारे व कब्रांना नुकसान पोहोचविले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणासंदर्भात वक्फ ट्रिब्युनलमध्ये दावा क्र. 11/2025 दाखल असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगण्यात आले.
मशिदी व वक्फ संपत्तीच्या संरक्षणासाठी एमआयएम पक्ष जनतेच्या पाठीशी सदैव उभा राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांच्यासह शाकेर खान, भाई इम्तियाज, रजवी फैजान, शाहरेज सिद्दीकी, समीर कुरेशी, शेख आमेर, सायमा शाहरेख शेख, खीजर भाई, इमान खान, सुलतान शेख तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?