माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या हस्ते श्रीगणेश महासंघाच्या गणरायाचे पूजन...

 0
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या हस्ते श्रीगणेश महासंघाच्या गणरायाचे पूजन...

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या गणरायाचे पूजन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )दि.17(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निराला बाजार येथील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयास भेट देऊन श्री गणेश महासंघाच्या श्री गणरायाचे गुरुवारी (दि. 17) पूजन केले. श्री गणरायाला सर्वाना आरोग्य व सुख समृद्धी आणि आनंद मिळू दे असे साकडे घालत ठाकरे यांनी आपली भावना गणरायाच्या चरणी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार अनिल देसाई यांचीही उपस्थिती होती. 

यावेळी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे पाटील यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. तर कार्याध्यक्ष दिनेश राजेभासले यांनी खा. अनिल देसाई यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष अनिकेत निल्लावार, विशाल दाभाडे, संदिप शेळके, हरीश शिंदे, लक्ष्मीनारायण बाखरीया, प्रविण शिंदे, प्रितेश जैस्वाल, सुनिल धात्रक, सुधिर घाडगे, नितीन झरे, संजीवन सरोदे, प्रसाद चौधरी, अमोल लोहिया, राजू पाटोळे, समाधान पाटील, सागर निकम, विजय कोतकर, विशाल जाधव, निखिल बारवाल, आकाश राठोड, मुना बारवाल, नरेश हिवाळे, भरत हिवाळे, गजानन हिवाळे, शिवाजी भाऊसाहेब हिवाळे, चंद्रकांत हिवाळे, अभिषेक हिवाळे, ऋषिकेश अवसरमोल, निखिल गिरी, ओमकार मुनगीकर, केशवसिंग सूर्यवंशी, ऋषिकेश मुळे, साहिल सूर्यवंशी, कृष्णा डमाळे, ऋषिकेश हिवाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांनी केले. 

श्री गणेश महासंघाच्या वतीने ऑनलाईन " महालक्ष्मी सजावट" स्पर्धा"

गुरुवारी महालक्ष्मीचे आगमन झाले असून शहरातील गृहणींसाठी जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने 

शुक्रवार, दि. 18 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून यासाठी कार्याध्यक्ष दिनेश राजेभोसले (मो.9921963038), हरीश शिंदे (मो.9921319121) यांच्याशी स्पर्धकांनी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow