सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.18 (डि-24 न्यूज)- टोयोटा कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बिडकीन येथे शाळा उभारणीचे काम करण्यात येणार असून तत्संबंधी अधिक तपशिल महिना अखेर होणाऱ्या सामंजस्य कराराच्या वेळी स्पष्ट केला जाईल.
यासंदर्भात आज टोयोटा संस्थेचे जनरल मॅनेजर रवी सोनटक्के व प्रोजेक्ट जनरल मॅनेजर जगदीश पी.एस. यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगिता राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.
झालेल्या चर्चेनुसार, टोयोटाची प्रकल्प उभारणी होत असून लवकरच आपल्या उद्योग क्षेत्रात कंपनीच्या ध्येय्यधोरणानुसार सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सामाजिक हिताचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यात बिडकीन येथे शाळा उभारणीचे काम ही संस्था करणार आहे. अत्याधुनिक शाळेची उभारणी यानिधीतून कंपनी करुन देणार आहे. त्यासाठी या महिनाअखेर जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करारही केला जाणार आहे. त्यावेळी अधिक तपशिल देण्यात येईल,असे सोनटक्के यांनी सांगितले.
What's Your Reaction?






