बुलडोझरला विश्रांती...VIP रस्त्याची मोजणी सुरु...

 0
बुलडोझरला विश्रांती...VIP रस्त्याची मोजणी सुरु...

व्हीआयपी रोडची मोजणी झाली, बाबा पेट्रोलपंप ते दिल्लीगेट रस्ता 35 मीटर...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 

सध्या महापालिकेच्या वतीने बुलडोझर कार्यवाई थांबलेली आहे. शहरातील नागरीक थेट कार्यवाईने भयभीत झाली होती. थेट व्यवसायिक मालमत्ता भुईसपाट केले जात होते परंतु या आठवड्यात मुख्य रस्त्यांची मोजणी, मार्कींग करुन नागरीकांना सूचना दिली जात आहे. किलेअर्क परिसरात मार्किंग झाल्याने स्वतः मालमत्ताधारक नुकसान होऊ नये म्हणून अतिक्रमण काढत आहे. हर्सुल जेल ते जटवाडा रोडवर अजून मार्किंग झाली नाही तरीही शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमण व्यवसायिक स्वतः काढत आहे. 

हर्सुलचे नागरीकांनी न्यायालयात याचिका टाकली आहे. हर्सूल रोडवर मार्किंग केल्यानंतर महापालिकेच्या पथकाने आता आपला मोर्चा शहरातील VIP रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा पेट्रोलपंप, महावीर चौक ते दिल्ली गेट रस्त्याकडे वळवला आहे. आज शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने मार्किंग करण्याच्या कामाला सुरवात केली. हा रस्ता 35 मीटरचा होणार असून, दिवसभरात भडकल गेटपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 17.5 मीटर मोजणी करून मार्किंग करण्यात आली. 

महापालिकेच्या वतीने जून महिन्यापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा ते मनपा हद्द, रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप आदी रस्त्यावरील बांधकामे पाडण्यात आली. त्यानंतर सेव्हन हिल ते एपीआय कॉर्नरपर्यंत मार्किंगवरून गोंधळ निर्माण झाल्यापासून कारवाईची गती मंदावली आहे. जालना रोड हा बाबा पेट्रोलपंप पासून ते सेव्हन हिलपर्यंत 60 मीटरचा तर सेव्हन हिलपासून पुढे एपीआय कॉर्नरपर्यंत 45 मीटरचा कसा ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. असाच प्रकार दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट रस्त्याच्या मार्किंग करतानाही समोर आला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी हर्सूल टी पॉइंट ते मनपा हद्दीपर्यंत मार्किंग करण्यात आली आहे. तर गुरुवारी (दि.17) नारेगाव मुख्य रस्त्यावर मार्किंग करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पथकाने व्हीआयपी रोडवर मोजणी करून मार्किंग केली. यावेळी नगर रचना विभागाचे राहुल मालखेडे, सूरज चव्हाण, नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक आदींसह सुमारे 40 कर्मचारी सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow