निवडणूकीच्या तयारीला लागा, मतदारांपर्यंत जावून समस्या सोडवा - सुनील तटकरे

निवडणूकीच्या तयारीला लागा, मतदारांपर्यंत जावून समस्या जाणून घ्या - सुनील तटकरे
छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) -
नोव्हेंबर किंवा डिसेंबर महीन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होणार आहे. आजपासूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. आप आपल्या मतदारसंघात जावून मतदारांच्या समस्या जाणून घेवून सोडवा. विधानसभा निवडणूकीत विरोधकांची मोठा पराभव झाला. सत्ता आपली आली. यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समीती निवडणूकीत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष संघटना मजबुत करावी. या निवडणूकीची तयारीसाठी राज्याचा दोरा सुरु केला आहे. दौरा उत्तर महाराष्ट्रातून सुरु केला आहे. महायुती होईल किंवा नाही ते वरिष्ठ नेते ठरवतील परंतु आपण स्वबळाचीही तयारी करायला हवी. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते येथे स्थानिक चेहरे बघितली जातात असे मार्गदर्शन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
उस्मानपुरा येथील संत एकनाथ रंगमंदीर येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
व्यासपीठावर महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, प्रवक्ते आनंद परांजपे, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, सूरज चव्हाण, शोभा खोसरे, माजी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, बाळासाहेब पवार, नबी पटेल, स्वाती कोल्हे, भाग्यश्री राजपूत, गयास बागवान, कय्यूम अहेमद, रफीक भाईजी, शेख आजम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना तटकरेंनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत सर्व जाती धर्मांना सोबत घेत पुढे जायचे आहे. जनतेसोबत संवाद वाढला पाहीजे. अल्पसंख्यांक समाजाने सोबत उभे राहायला हवे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कटीबध्द आहे. विविध राजकीय पक्षातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे हे महत्वाचे आहे. शहर आणि जिल्ह्याची कार्यकारीणी एका आठवड्यात बनवावी. 1 ऑगस्ट पासून नवी कार्यकारीणीने काम सुरु करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील माजी नगरसेवक अजिज खान गणी खान, अबूबकर अमोदी, अब्दुल अजीम, नुरजहाँ बेगम, शेख महेमुद, सलाऊद्दीन बागवान व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहिर प्रवेश केला.
What's Your Reaction?






