जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीबाबत सादरीकरण

जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीबाबत सादरीकरण...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.17 (डि- 24 न्यूज)- जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला असून या विकास आराखड्याची अंमलबजावणी ‘चॉईस’ ही संस्था जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत करणार आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीचे नियोजन वआराखडा आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासमोर सादर करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, चॉईस संस्थेचे प्रा.डॉ.सोमेन मुजूमदार, प्रकल्प प्रमुख देविदास सुसे, जिल्हा व्यवस्थापक अब्रार अहमद, उद्योग विशेषज्ञ अंकूर खरे, पर्यटन विशेषज्ञ राज नगर, डाटा व्यवस्थापक अपूर्व फडणवीस, अर्थ विशेषज्ञ अरविंद श्रीवास्तव, सामाजिक आर्थिक विशेषज्ञ बिस्वरुप खा आदी यावेळी उपस्थित होते.
महास्ट्राईड या उपक्रमांतर्गत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. त्यात राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन इतकी सन 2029 पर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यासाठी हा आराखडा ‘मित्रा’ या संस्थेने तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात होत असून ही अंमलबजावणी जिल्हा प्रशासनातील संबंधित विभागप्रमुखांच्या अखत्यारीत नियुक्त संस्था करील. जिल्ह्याला प्राथमिक क्षेत्रात वार्षिक 137 कोटी 1 लाख 54 हजार रुपये तर पंचवार्षिक 642 कोटी 48 लक्ष 27 हजार रुपये. दुय्यम क्षेत्रात 129 कोटी 97 लक्ष 95 हजार रुपये वार्षिक तर पंचवार्षिक 388 कोटी 31 लाख 36 हजार रुपये तर तृतीय क्षेत्रात 218 कोटी 12 लक्ष 58 हजार रुपये वार्षिक तर 2041 कोटी पंचवार्षिक इतकी अर्थव्यवस्था जिल्ह्यात निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्याचे सध्याचे दरडोई उतपन्न सरासरी 2 लक्ष इतके असून ते येत्या पाच वर्षात दीडपट वाढविण्याच्या दृष्टीने धोरणे आखण्यात आली आहे, अशी माहिती सोमेन मुजूमदार यांनी दिली.
यादृष्टिने क्षेत्रनिहाय (अर्थ, बांधकाम, कृषी, कृषी उद्योग, उद्योग इ. प्रमाणे) वाढीसाठी धोरणे राबविण्यात येणार असून त्याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर चॉईस संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले.
What's Your Reaction?






