प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सिमांकनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन...

 0
प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सिमांकनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन...

छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सिमांकनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि18, (डि-24 न्यूज) :-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, क्षेत्रात भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठी सिमांकन करण्यात येत आहे. तसेच बांधकामाबाबत भविष्यात होणारी नागरिकांची फसवणूक व आर्थिक हानी टाळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन व बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत तसेच संबंधित यंत्रणांना सिमांकनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, क्षेत्रात गेल्या आठवड्याभरापासून रस्त्यांच्या सिमांकनाची कार्यवाही संबंधित यंत्रणांकडून सुरु आहे, सदर सिमांकनांच्या कार्यवाहीबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत प्राधिकरण क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांची शासन नियमात नमूद केलेल्या इमारत रेषा व नियंत्रण रेषा यांचे सिमांकन करण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणा जसे की, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जागतिक बैंक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर व इतर यंत्रणाकडून सुरु आहे. 

शासनाने प्रत्येक रस्त्याच्या प्रकारानुसार इमारत रेषा व नियंत्रण रेषा रस्त्याच्या मध्यापासून किती अंतरावर असाव्यात या बाबतची नियमावली मंजूर केलेली आहे. सद्यस्थितीत अशा जागा हद्द फक्त नागरिकांना अवगत व्हावे म्हणून सिमांकीत करण्यात येत आहेत.

यंत्रणांच्या मालकीच्या जागेत रस्त्यात येणारी तात्पुरते पक्की बांधकामे अतिक्रमीत समजण्यात येतील व तो संबंधित विभागाकडून निष्कासित करण्यास पात्र ठरतील. 

नियंत्रण इमारत रेषेच्या आतमध्ये येणारी व संबंधित विभागाकडून परवानगी न घेता केलेली बांधकामे ही अनधिकृत समजण्यात येतोल, अशी अनधिकृत बांधकामे निर्मूलनाबाबत तूर्त कार्यवाही करण्यात येणार नाही.

भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यासाठी सिमांकन करण्यात येत आहे. तसेच बांधकामाबाबत भविष्यात होणारी नागरिकांची फसवणूक व आर्थिक हानी टाळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन व बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत तसेच संबंधित यंत्रणांना सिमांकनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow