शहरात कर भरण्यासाठी रात्रीही झोन कार्यालय सुरु, मनपा आयुक्तांनी केली पाहणी

शहरात कर भरण्यासाठी रात्रीही झोन कार्यालय सुरु...
प्रशासकांनी रात्री केली झोन 4 ची पाहणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी कर शास्तीवर सूट दिल्याची घोषणा केल्यानंतर नागरिकांची सोयीसाठी सर्व झोन कार्यालय रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवावे असे निर्देश दिले होते. यानिमित्त त्यांनी आज रात्री 8.45 वाजता झोन क्रमांक 4 चे कार्यालय, टीव्ही सेंटर येथे अचानक भेट दिली आणि कर वसुलीच्या आढावा घेतला.
"शासती से आझादी" या योजनेअंतर्गत दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत निवासी मालमत्ता वरील थकीत कर एक रकमी भरल्यास शास्तीवर 95 टक्के सूट महानगरपालिका तर्फे देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी प्रशासक महोदय यांनी झोन कार्यालय सुट्टीच्या दिवशी देखील उघडे ठेवण्याचे आणि रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते.
झोन कार्यालय रात्री 10 वाजेपर्यंत काम करत आहे याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी झोन क्रमांक 04 येथे आज रात्री 8.45 वाजता भेट दिली आणि आढावा घेतला.
What's Your Reaction?






