मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणरायाची आरती...

 0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणरायाची आरती...

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या गणरायाची आरती

छत्रपती संभाजीनगर, दि.17(डि-24 न्यूज)- विनोद भैय्या पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या गणरायाची आरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाचे दर्शन घेत आरती केली. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिमय वातावरणात गणरायाचा जयघोष केला.

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या गणेशोत्सव सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरतीनंतर महाराष्ट्राच्या सुख, समृद्धी, शांतता आणि प्रगतीसाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow