खाम नदी परिसरात स्वच्छता ही सेवा "एक पेड माँ के नाम" अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम
खाम नदी परिसरात स्वच्छता ही सेवा "एक पेड माँ के नाम" अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) महानगरपालिका व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे स्वच्छता ही सेवा 2024 - या मोहिमेंतर्गत "एक पेड मा के नाम" या संकल्पने अंतर्गत खाम नदी परिसरात 1000 देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख श्री. रवींद्र जोगदंड सर यांनी स्वच्छता ही सेवा - एक पेड मा के नाम अभियानाविषयी नागरिकांना, विध्यार्थ्यांना माहिती दिली पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगितले व प्रत्येकाने एक झाड लावावे त्याचे संवर्धन करावे असे सांगितले.
तसेच "मेगा क्लिननेस ड्राईव्ह" या कार्यक्रमात संपूर्ण खाम नदी काठाची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता या वेळी करण्यात आली, जवळपास 250 ते 300 किलो सुका कचरा संकलन यावेळी करण्यात आले. यावेळी टाकाऊ पासून बनविलेल्या वस्तूंची पाहणी विद्यार्थ्यांनी केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड, राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालिका डॉ.सोनाली क्षीरसागर,सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, सहायक आयुक्त असदुला खान, , प्रा.प्रशांत अवसरलमल, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, वंदना पवार, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, तसेच मनपा क्षेत्रीय कार्यालय दोन चे सर्व स्वच्छता कर्मचारी, विवेकानंद महाविद्यालय व इतर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित
होते.
What's Your Reaction?