मनपा विद्यार्थ्यांच्या टर्फ क्रीकेट स्पर्धेत मिटमिटा संघ विजयी....!

मनपा विद्यार्थ्यांच्या टर्फ क्रिकेट स्पर्धेत मिटमिटा संघ विजयी...
खेळाच्या माध्यमातून शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास होतो संतोष वाहुळे....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आम्हाला खेळू द्या
या उपक्रमा अंतर्गत महानगरपालिकेचे मैदान अद्यावत करणे सुरू आहे.
मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी व गारखेडा या शाळेमध्ये टर्फ ची निर्मिती करण्यात आली आहे.
या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तथा एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले संतोष वाहुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे,
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्निल सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्पर्धेचे आयोजक तथा मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
ही स्पर्धा प्रियदर्शनी व गारखेडा शाळेच्या टर्फ वर झाली या स्पर्धेत एकूण 21 संघानी सहभाग नोंदवला.
यामध्ये प्रथम क्रमांक मिटमिटा संघाने प्राप्त केला. यांनी फलंदाजी करताना एकूण 75 रन यामध्ये राम सावंत याने चार षटकार आणि दोन चौकार च्या साह्याने 32 रन काढले. प्रतिस्पर्धी संघ प्राथमिक शाळा अशोक नगर यांनी 75 रनांचा पाठलाग करत 51 धावांपर्यंत मजल मारली...
उद्या दिनांक 1 ऑक्टोबर रोजी इयत्ता नववी व दहावीचे 17 संघ प्रियदर्शनी टर्फ वर सामने खेळतील.
असे स्पर्धेचे आयोजक शशिकांत उबाळे यांनी सांगितले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनोद वटणे, वशिष्ठ लोकरे ,भरत पुसे , काकासाहेब जाधव, प्रकाश इंगळे, संजय मरकड, विजय कोल्हे, शुद्धोधन वाघमारे, गोविंद कुलकर्णी यांनी परिश्रम
घेतले.
What's Your Reaction?






