कांचनवाडीत मनपाचा पेट्रोलपंप सुरू, दिव्यांगांना मिळाली नोकरी
मनपाचा कांचनवाडी येथील पेट्रोलपंप नागरिकांच्या सेवेत...
सक्षम पेट्रोलियम येथून इंधन विक्रीस सुरुवात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्ती द्वारे पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. आज या पेट्रोल पंप वरून प्रत्यक्ष इंधन विक्री सुरू करण्यात आली आहे.
दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या कांचनवाडी येथील सक्षम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदरील पेट्रोल पंपावर प्रत्यक्ष इंधन विक्रीला सुरुवात व पेट्रोल पंपावर नियुक्त दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. खालील दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले आहे.
राहुल भिमराव आरके,
शेख नवीन शेख सईद,
मिर्झा माजेद बेग,
सुमित अण्णा सातदिवे,
शेख मो. जलील शेख मो. वहाब, राजेंद्र मुरलीधर गिन्हे, मो. वसीम अब्दुल कदीर बागवान, अजिनाथ सुखदेव पैठणकर.
याप्रसंगी शहर अभियंता- ए.बी.देशमुख, उपायुक्त-2-अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी)- अमोल कुलकर्णी, तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशनचे विशाल शर्मा व अजय सिन्हा तसेच महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता- वैभव गौरकर, अहेमद मिर्झा व सुनील लोखंडे हे उपस्थित होते.
दिव्यांग व्यक्ती सुध्दा इतरापेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाहीत, ते इतर व्यक्तीसारखेच सक्षम आहेत. एखादा नोकरी/व्यवसाय तेही सक्षमरित्या करु शकतात, फक्त त्यांना एक चांगली संधी देणे आवश्यक आहे. अशी प्रशासक तथा आयुक्त यांची संकल्पना आहे. या संकल्पनेतून महानगरपालिकेने हा सक्षम पेट्रोलियम हा दिव्यांगाद्वारे सुरु केला आहे. महानगरपालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपा प्रमाणेच हा सक्षम पेट्रोल पंप नागरिकांना उच्च दर्जाचे व योग्य प्रमाणात इंधन पुरवठा करुन लवकरच नावारुपाला येईल अशी अपेक्षा मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आ
ली आहे.
What's Your Reaction?