शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये बीएलओ 12 दिवसांनंतर रुजू, एमआयएमची स्वागत करुन गांधीगिरी...!
12 दिवसांनंतर प्रभाग 14 मध्ये बीएलओ हजर, एमआयएमची स्वागत करुन गांधीगिरी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) - 29 जूनपासून एस आय आर चे काम सुरू झाले आहे. परंतु शहरातील प्रभाग क्रमांक 14, संजयनगर-बायजीपुरा येथील मतदार यादी क्रमांक 95 साठी आज 12 जूलै 2026 रोजी रविवारी, बीएलओ प्रकाश उंदाळे हे हजर झाले. 12 दिवसांची येथील मतदारांना प्रतिक्षा करावी लागली व मनस्ताप झाल्याने एमआयएम नगरसेवकेचे वडील अमजद खान यांनी त्यांचे स्वागत करत गांधिगिरी केली. बीएलओ हजर झाले नसल्याने अनेक दिवसांपासून तहसीलदार कार्यालय व निवडणूक विभागाकडे पाठपुरावा केला होता. येथील मतदार यादी क्रमांक 95 मध्ये नियुक्त बीएलओचा अपघात झाल्याने ते रुग्णालयात दाखल असल्याने रुजू होऊ शकले नाही परंतु दुसरा बीएलओ नियुक्त करण्यासाठी 12 दिवस उशिर झाल्याने येथील मतदार भयभीत झाले होते. 17 दिवसांत या बीएलओ कडून काम पूर्ण होणे शक्य आहे का असा सवाल अमजद खान यांनी उपस्थित केला आहे. यांना प्रशासनाने सहायक पण दिलेला नाही. या यादीसाठी काम पूर्ण व्हावे म्हणून 12 दिवस वाढवून द्यावे अशी मागणी एमआयएमच्या वतीने यावेळी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
What's Your Reaction?