देवळाई वन उद्यानात मनोरंजनासह वन शिक्षणही मिळणार - पालकमंत्री संजय शिरसाट
'देवळाई वन उद्यानात' मनोरंजनासह वनशिक्षणही मिळणार'- पालकमंत्री संजय शिरसाट....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.22(डि-24 न्यूज)-महानगरपालिका क्षेत्रातील देवळाईत 7 हेक्टरवर 'वनउद्यान' हे शहरवासीयांसाठी मनोरंजन आणि वन शिक्षणाचे केंद्र बनणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले.
महानगरपालिका क्षेत्रातील देवळाई परिसरात
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वन उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी 4 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती आशा चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका हर्षदा शिरसाट, राजू राजपूत ,वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे, निखिल देशमुख, व कर्मचारी उपस्थित होते.
शहरात निसर्गाचा गारवा अनुभवता यावा यासाठी देवळाई वनपरिक्षेत्रांतर्गत 7 हेक्टर क्षेत्रावर साकारल्या जाणाऱ्या वन उद्यानाचे नियोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर होणारे हे पहिलेच वनउद्यान ठरणार असून, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (2025-26) 4.80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यामध्ये मनोरंजनासोबतच 'वन शिक्षण' देण्यासाठी तसेच ती फिरण्यासाठीची जागा न राहता, हे उद्यान एक 'Forest Education' केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे.
येथील प्रत्येक झाडावर त्याचे नाव आणि माहिती देणारे फलक, वन्यप्राण्यांची माहिती देणारे माहितीचे फलक लावले जाणार आहेत, जेणेकरून भावी पिढीला वनांचे आणि वन्यजीवांचे महत्त्व समजण्यात मदत होईल. फुलपाखरू व बांबू उद्यान, असून दुर्मिळ वृक्ष संवर्धन करण्यासाठी वृक्षांची विशेष लागवड यात होणार आहे. ओपन जिम, मुलांसाठी खेळणी आणि सँड पिट्स.
संपूर्ण जंगल आणि परिसराचा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी उंच टॉवर. आकर्षक प्रवेशद्वार, बसण्यासाठी पॅगोडा आणि चालण्यासाठी पादचारी मार्ग यात बाबीचा समावेश यात आहे.
What's Your Reaction?