अयोध्येत राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा उत्साहात, शहरात उत्साह आणि जल्लोष

 0
अयोध्येत राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा उत्साहात, शहरात उत्साह आणि जल्लोष

अयोध्येत राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा उत्साहात, शहरात उत्साह आणि जल्लोष

किराडपूरा ऐतिहासिक राममंदिरात रामभक्तांची गर्दी, 551 किलोचा बुंदीचा लाडू महाप्रसादाचे आकर्षण, आरतीसाठी भक्तगण उपस्थित, पोलिसांचा बंदोबस्त तैनात, मुस्लिम बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून दिला एकतेचा संदेश...

आज देशभरात दिवाळी साजरी होणार....

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न झाली. देशभरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. शहरातील ऐतिहासिक किराडपूरा येथील राम मंदिरात सुध्दा सकाळपासून रामभक्तांची दर्शनासाठी गर्दी होती. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले होते. ट्रॅक्टरवरुन सजावट करुन महाप्रसाद 551 किलोचा लाडू आकर्षण होते. यावेळी महाप्रसाद भक्तांना वाटप करण्यात आला. स्क्रीनवर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम उपस्थितांनी बघितला. हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवा गमछा घालून श्रीरामाचा जयघोष करत, फटाक्यांची आतिषबाजी, बाईक रैली, हातात भगवे झेंडे घेत रामभक्त शहरातून दर्शनासाठी येत होते.

शहरात व किराडपूरा येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळपासून मुस्लिम बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून एकतेचा संदेश दिला. स्वतःहुन किराडपूरा ते आझाद चौक पर्यंत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवून सहकार्य केले.

आरती पुजारी पालकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, किराडपूरा राम ट्रस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, उपाध्यक्ष सुधिर विध्वस, सरचिटणीस दयाराम बसैय्ये, चिटणीस उत्तमराव मनसुटे, कोषाध्यक्ष एड विजय शिंदे, अवधुत जगताप व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तात पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत, सहायक पोलिस मसूद खान, सहायक पोलिस आयुक्त ठुमरे, 

जीन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे, पोलिस निरीक्षक अशोक भंडारी, पोलिस निरीक्षक सोळुंके, पोलिस उपनिरीक्षक सय्यद रियाज अहेमद व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित

होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow