अप्रिय घटना घडल्यास काही मिनटात पोहोचू, पोलिस आयुक्तांचे नागरीकांना आवाहन

 0
अप्रिय घटना घडल्यास काही मिनटात पोहोचू, पोलिस आयुक्तांचे नागरीकांना आवाहन

अप्रिय घटना घडल्यास काही मिनटात पोहोचू- पोलिस आयुक्त मनोज लोहिया 

आयुक्तालयात घेतली राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक...

औरंगाबाद, दि.21(डि-24 न्यूज) अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी उत्सव साजरा केला जाणार आहे. किराडपूरा येथील राम मंदिरात विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. शहरातील वातावरण चांगले असून, कोणतीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता वाटत नाही, मात्र काही घडल्यास, तात्काळ पोलीसांना 112 नंबर वर फोन करुन माहिती द्या आम्ही अवघ्या सहा मिनिटांच्या आत तिथे पोहोचून परिस्थिती सांभाळून घेऊ. नागरिकांनी खेळीमेळीच्या वातावरणात हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे.

आज त्यांनी पोलीस आयुक्तालयात सामाजिक संघटना आणि काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला. या बैठकीत सर्व जाती धर्मातील धर्मगुरू, राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर आयुक्त लोहिया यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यांनी सांगितले सन 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर अयोध्यात मंदिर बांधण्यात आले. 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठा केली जाणार आहे. हा उत्सव देशभरात दिवाळी प्रमाणे साजरा होणार आहे. त्यानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये पूजा-अर्चना, आरती होईल. त्याठिकाणी मोठ्या संख्येने हिंदू बांधव जमतील. उत्साहाचे वातावरण राहिल. अशा वातावरण संवेदनशिलता वाढते. त्यामुळे पोलीस प्रशासनही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज आहे. 

हा एक उत्सव आहे. मुस्लिम समाजाबांधव त्यांचा सण साजरा करताना हिंदू बांधवांकडून सहकार्य केले जाते तसेच हिंदूच्या सणाला मुस्लीम बांधवांकडून सहकार्य असते. अशाच खेळीमेळीच्या वातावरणात दोन्ही समाजाच्या वतीने या कार्यक्रमाला सहकार्य राहिल. असे या बैठकीत सर्वांनी आश्वासित केले आहे. शहरातील वातावरण चांगले आहे. अप्रिय घटना घडण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले 

प्रत्येक पोलीस ठाण्याचे हद्दीत तीन-चार फिक्स पॉइंट लावले आहे. पेट्रोलिंग वाढवले आहे. एक एसआरपी, रिझर्व्ह फोर्स कंपनी शहरात दाखल झाली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल होत असल्यास किंवा अप्रिय घटना समजल्यास 112 नंबरवर पोलीसांशी संपर्क साधवा. आम्ही काही मिनिटांच्या आत तिथे पोहचू. कोणतीही अप्रिय घटना घडल्यास ती परिस्थिती स्वत: हॅण्डल करण्याऐवजी पोलीसांना सूचना द्या. आम्ही आपल्या सुरक्षेसाठी आहोत. सोमवारी शहरातील आमच्याकडील एकूण फोर्सपैकी 80 टक्के फोर्स बंदोबस्तासाठी तैनात राहिल, असेही आयुक्त लोहिया यांनी डि-24 न्यूजला सां

गितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow