कमान पाडल्याच्या निषेधार्थ पँथर सेनेचा एल्गार...

पँथर सेनेने केले क्रांतीचौकात आंदोलन, कमान तोडल्याने व्यक्त केला संताप
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)
आज क्रांती चौकात ऑल इंडाया पँथर्स सेनेच्या वतीने दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
मुकुंदवाडी संजयनगर येथील अतिक्रमण कार्यवाईत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या प्रतीकृती असलेली कमान जी नामांतर लढ्याची आणि शहिदांच्या बलिदानाची साक्ष आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली कोणतीहि नोटीस न देता बेकायदेशीरपणे पाडण्यात आली. हि केवळ कमान नाही तर अस्मितेचे अभिमानाचे आणि संघर्षाचे प्रतिक आहे. हे कृत्य म्हणजे आंबेडकरी समाजावरील सुनुयोजित हल्ला आहे. महापालिकेच्या या दडपशाही कार्यवाईमागे भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा इशारा आहे. असा आरोप क्रांतीचौक येथे आंदोलन करताना भारतीय पँथर सेनेच्या आंदोलनात केला.
आंबेडकरी समाजाने संतप्त आंदोलन करत मागणी केली संजय नगर कमान भव्य स्वरुपात तात्काळ उभारली जावी. कार्यवाही करणा-या अधिका-यांचे निलंबन मोबाईल रेकाॅर्डींगची चौकशी करुन कोणत्या आमदाराच्या इशा-यावर कार्यवाही झाली याची सखोल चौकशी करावी. नोटीस न देता कमान का पाडली स्थानिक बौध्द बांधवांना विश्वासात न घेता शांतता समितीची बैठक न घेता ही दडपशाही का केली. मोबदला आणि पुनर्वसन बेकायदेशीरपणे पाडलेल्या मालमत्तांचा मोबदला द्या. बेघर झालेल्यांना घरे आणि व्यवसाय गमावले त्यांना एमईजीपी अंतर्गत 50 लाखांचे व्यवसायिक कर्ज द्या. सर्व अतिक्रमण कार्यवाहीची चौकशी करुन दोषींवर कठोर कार्यवाई करावी. मुख्यमंत्र्यांनी स्वत: भुमिका जाहिर करावी. बेघर झालेल्यांचे पुनर्वसन आणि मोबदला देण्यासाठी भुमिका स्पष्ट करावी. चिकलठाणा स्थित महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भव्य स्वरुपात उभारावा त्यानंतरच येथील पुतळा समाजबांधवांच्या हाताने हलवावा. राज्य सरकारने मागणी मान्य केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व दिपक केदार यांनी केले. यावेळी राज्य सचिव सचिन तिवारी, राज्य युवा अध्यक्ष बंटी सदाशिवे, जिल्हाध्यक्ष अमोल शेजूळ, युवा जिल्हाध्यक्ष अविनाश हिवाळे, मराठवाडा युवा संघटक कमलेश दाभाडे, शहराध्यक्ष कुणाल दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश गंगावणे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






