अनिस पटेल यांची काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती...

अनिस पटेल यांची अल्पसंख्यांक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)
काँग्रेसचे अनिस पटेल यांची अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिस पटेल यांचा परिचय सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रहिवाशी व काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत अनिस इमाम पटेल यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार इमरान प्रतापगडी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अहमद खान तसेच अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष माजी आ डॉ. वजाहत मिर्झा यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अल्पसंख्यांक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अनिस पटेल यांची पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी जालना जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार तथा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे व छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांनी शिफारस केली होती. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. जफर अहमद खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव नासेर नजीर खान, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक विभागाचे सचिव शेख कैसर आजाद, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव खालेद पठाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईन इनामदार, आमेर अब्दुल सलीम, जगन्नाथ काळे, अतिश पितळे, गौरव जयस्वाल, सूर्यकांत गरड, डॉ. अरुण शिरसाट, डॉ.निलेश आंबेवाडीकर, अनिताताई भंडारी, शेख कैसर बाबा, रईस शेख, रवी लोखंडे, मंजूताई लोखंडे, अस्मत खान, आवेश कैसर आजाद, सय्यद फराज आबेदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
What's Your Reaction?






