बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या पिडीत कुटुंबाला शिवसेनेच्या प्रयत्नाने 25 लाखांची मदत
बिबट्याचा हल्ल्यात मृत पावलेल्या पिडीत कुटुंबास २५ लाखाची मदत
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.28(डि-24 न्यूज) कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील विलास नारायण राठोड यांचा मुलगा ऋषीकेश विलास राठोड ( १५ )
बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यांच्या कुटुंबास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तात्काळ वन विभाग कडून २५ लाख रुपयांची मदत मिळवून दिली. कुटुंबास सांत्वन पर भेट देऊन मी कायम तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच यावेळेस उपस्थित वन विभाग व महसूल विभाग यांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे सूचना दिले.
कुटुंबास भेट देण्याआधी खैरे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सदरील घटनेची सविस्तर माहीती देऊन पिडीत कुटुंबास तात्काळ मदत करा व नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी केली होती. यानंतर पिडीत कुटुंबास देत हे कुटुंब कायम शिवसेनेसोबत आहे ते कुटुंब शिवसेना परिवारातील आहे असे सांगितले. यावेळेस भांबरवाडी येथील ग्रामस्थ संतप्त झालेले होते. तसेच बिबट्याच्या भितीने भयभीत झाली होती.
सदरील घटनेला ४ दिवस उलटून गेल्यावर देखील प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने व बिबट्यास देखील जेरबंद न केल्याने ग्रामस्थ संतप्त होऊन प्रशासना विरोधात आंदोलन तसेच रास्ता रोको करण्याच्या तयारीत होते. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी वन मंत्रीपद भुषवलेले असल्याने त्यांना अशा घटनेचा अनुभव होता. सदरील परिस्थिती संयमाने हाताळत त्यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून घडलेल्या घटनेची सविस्तर चौकशी केली. त्यावरील पर्याय सांगून पिडीत कुटुंबाचे समाधान केले. त्यावर पिडीत कुटुंबास तात्काळ वन विभागाचे विभागीय वन अधिकारी वन्य जीव मोहन नाईकवाडे यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश १५ लाख रुययांची कुटुंबाच्या नावावर मुदत ठेव ( फिस्क डिपॉझिट) देण्यात आला.
यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना सदरील बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. यावेळेस उपस्थित ग्रामस्थांनी सदरील बिबट्या हा नर भक्षक झाला असून त्याने या आधी कुत्र्यांवर हल्ला करून ठार मारल्याचे सांगितले. आता मुलाला ठार मारले असून येणाऱ्या काळात आणखी हल्ला करण्याची शक्कता असल्याचे सांगितले. यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ भयभीत झाले असून सदरील बिबट्यास तात्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रमस्थांनी केली. शेवटचे वृत हाती आले तोपर्यंत वन विभागाच्या वतीने बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरे व कॅमरे घटना स्थळी आणल्याची माहीती मिळाली आहे.
यावेळेस त्यांच्यासोबत लोकसभा समन्वयक सुदाम मामा सोनवणे पाटील, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, शिवा लुंगारे, कन्नड तालुक्यातील पदाधिकारी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे , सरपंच अशोक दाबके, संजय मोटे, शिवाजी थेटे, सरपंच राजु राठोड, सोपान पाटील, अप्पासाहेब पाटील, गुलाब साळुंके, विश्वनाथ त्रिभुवन, बंटी सुरे, सलमान शेख, रामराव राठोड, सईदास जाधव, माजी चेअरमन नारायण राठोड, उपसरपंच देवीदास राठोड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, तलाठी रमेश चव्हाण , वन विभागाच्या रोहीणी साळुंके, डॉक्टर प्रविण पवार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.
What's Your Reaction?