नशेसाठी वापरले जाणारा औषधांचा 12 लाखांचा साठा पोलिसांनी केला जप्त, 41 आरोपींवर गुन्हा दाखल, 12 आरोपी अटक...

नशेसाठी वापरले जाणारा औषधांचा 12 लाखांचा साठा पोलिसांनी केला जप्त, 41 आरोपींवर गुन्हा दाखल 12 आरोपी अटक...
आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिस आयुक्त प्रविण पवार यांची माहिती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) शहरात मोठ्या प्रमाणात शहर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी कार्यवाई सतत सुरू आहे. शहरात गुंगी आणणाऱ्या औषधांचा मोठा पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) वाळूज परिसरातील व्हीआरएल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित पार्सल कंपनीवर छापा मारला. या छाप्यात 2504 कोरेक्स सिरपच्या बाटल्यांसह (20 बॉक्स), कार (एमएच-18-बीसी-6767), रिक्षा, मोबाइल आणि बनावट कागदपत्रे, बिल व परवाने असा सुमारे 12 लाख 48 हजार 200 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
तर पार्सल घेण्यासाठी आलेल्या एकासह त्याच्या तीन साथीदारांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुन्ह्याची व्याप्ती पाहता औषध विक्रेते, पुरवठादार, डिस्ट्रिब्युटर व स्थानिक पेडलर्स अशा तब्बल 41 जणांवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर छाप्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिस आयुक्तांच्या आदेशाने नेमलेल्या वेगवेगळ्या पथकांनी नाशीकसह इतर जिल्हे व शहरातून तब्बल 8 जणांना असे एकूण 12 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
अविनाश रामकृष्ण पाटील (वय 34, रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), अरशद इब्राहीम पठाण (वय 26, रा. बायजीपुरा), समीर शेख युनिस शेख (वय 23, रा. मोतीकारंजा), अब्दुल अजिम कदीर शहा (वय 30, रा. शहानुरवाडी), मोसीन अमिन तांबोळी ( वय 25, बायजीपुरा), सय्यद समीर सय्यद शौकत उर्फ स्टायलो ( वय 27, बायजीपुरा), सोहेल हानिफ शाह ( वय 24, बायजीपुरा), सोहेल सलीम ईलाबी (वय 20, नवाबपुरा, मोंढा रोड), रिजवान खान रशिद खान ( वय 25, रेंगटीपुरा), सय्यद अल्ताफ जफर ( वय 22, बायजीपुरा), अमोल दत्तात्रय येवले ( वय 30, धामोडे, येवला, नाशिक), रूपेश रामकृष्ण पाटील ( वय 29, शिरसगाव टाकळी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांना खात्रीलायक माहिती मिळाली होती की एक टोळी परराज्यातून विशेषतः उत्तराखंडातून कोडीनयुक्त सिरप मागवून शहरात महाविद्यालयीन युवक-युवतींना पुरवित आहे. आरोपींनी दाखवलेले मेडीकल त्या जागी नसून तेथे वॉटर प्युरीफायरचा व्यवसाय सुरु असल्याचे आढळले. बनावट कागदपत्रांचा वापर करून ट्रान्सपोर्टमार्फत औषध मागवले जात होते. पोलिसांनी महिनाभर पाळत ठेवल्यानंतर ही कारवाई केली.
या छाप्यात आरोपी अविनाश पाटील हा पार्सल घेण्यासाठी कारने आला असता त्याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून 20 बॉक्स उघडून पाहता त्यामध्ये रायटस सिरपच्या 2504 बाटल्या मिळाल्या. त्यानंतर माल घेण्यासाठी आलेले अरशद पठाण, समीर शेख आणि अब्दुल शहा हे ही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
तपासात उघड झाले की हे औषध स्वतः नशेसाठी स्ट्राँग आणि इफेक्टीव्ह असल्याने त्याला जास्त मागणी होती. आरोपी स्वतःच्या नावाचा वापर टाळून इतरांची नावे, बँक खाती, मोबाइल क्रमांक व वाहनांचा वापर करून व्यवहार करीत होते. ही संघटीत टोळी असून त्यांच्या विरोधात मकोका कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.
What's Your Reaction?






