S I R च्या कामात दिरंगाई, 137 बीएलओंना नोटीस, जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी...
S I R च्या कामात दिरंगाई, 137 बीएलओंना नोटीस, जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- जिल्हा प्रशासनाकडून 'एसआयआर'ची तयारी पूर्ण केली जात आहे. लागू होण्याच्या अगोदर सोमवारी
राजकीय पक्षांना दिली प्रक्रियेची माहिती. S I R च्या कामात 137 बीएलओंनी दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
राज्यात लवकरच मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) होणार असून त्याची पूर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणाची भूमिका काय राहणार आहे, याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडून अद्याप एसआयआरची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, त्यासाठी लागणारी पूर्व तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात 3264 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी एक बीएलओ या प्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक 10 बीएलओच्या मागे एक पर्यवेक्षकांचीही नियुक्ती झाली आहे. या कामासाठी चार हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. बीएलओच्या धर्तीवर राजकीय पक्षाला बीएलए नियुक्तीची मुभा राहणार आहे. जे प्रशासनाच्या बीएलओंना मदत करणार आहेत. मतदार याद्यांबाबत अनेक आक्षेप असल्याने ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने हे एसआयआर महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यात 2002 मध्ये म्हणजे 24 वर्षांपूर्वी तो करण्यात आला होता. दुबार नावे, स्थलांतरितांची नावे, मयतांची नावे, देशाचे नागरिक नसलेल्यांचीही नावे असल्याचे आरोप मतदार याद्यांवर झाले. त्यामुळे निवडणूक विभागाने एसआयआरची प्रक्रिया हाती घेतली आहे. एप्रिल 2026 पासून याला सुरुवात होणाऱ्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदारासाठी एक फॉर्म प्रिन्ट करुन दिले जाणार असून त्याला युनिक कोड दिला जाणार आहे. हे फॉर्म दोन प्रतीमध्ये बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांना देणार आहेत. आपले मतदार यादीमधील नाव मॅपिंग केल्यानंतरही फाॅर्म भरावा लागणार आहे. या फॉर्ममध्ये माहिती भरून ती बीएलओंना द्यावी लागणार आहे. त्यानंतर बीएलओ ऑनलाईन पद्धतीने ती माहिती भरणार आहेत. त्यावेळी 2002 मध्ये झालेल्या एसआरआरसोबत या माहितीचे मॅपींग केले जाणार आहे. मॅपींग योग्य असल्यास मतदान अधिकारी त्याला मंजुरी देणार आहेत. त्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. काही आक्षेप असल्यास त्याच्यावर अपील करता येणार आहे. आपीलांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतीम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.
What's Your Reaction?