फुलंब्रीत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या उपस्थितीत समस्या मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात...
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना 120 सायकलींचे मोफत वाटप
फुलंब्रीत समस्या मार्गदर्शन...
फुलंब्री, दि.15(डि-24 न्यूज) - फुलंब्री येथील म्हसोबा मंदिराजवळ, (जळगाव रोड, चौका) येथे आज शनिवारी जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत समस्या मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी त्यांच्या प्रेरणेतून 120 विद्यार्थ्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. उद्याही हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
आज पहिल्या दिवशी जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 120 सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपस्थितांनी या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, बहुजन कल्याण व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, खासदार कल्याण काळे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर समीर राजूरकर, सभापती अनिल मकरीये, उद्योजक विवेक देशपांडे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेवक विजय औताडे, बसवराज मंगरुळे, नगरसेवक उल्हास पाटील, सिद्धार्थ साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सायकल वाटप या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास मोठी मदत होणार आहे. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शिक्षणाला प्रोत्साहन मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सोहळ्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. कार्यक्रमासाठी भव्य उभारण्यात आला होता. आकर्षक संतपिठही उभारण्यात आले
होते.
What's Your Reaction?