गणेश महासंघाच्या वतीने उद्या महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, खो-खो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा

 0
गणेश महासंघाच्या वतीने उद्या महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, खो-खो स्पर्धा, कबड्डी स्पर्धा

जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने 

उद्या महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, खो-खो, कबड्डी स्पर्धा

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.8(डि-24 न्यूज) : शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढवा या उद्देशाने आज सोमवार, (दि.9) सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता क्रांती चौक येथून महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी शहरातील विविध महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात येईल तर सकाळी 10 वाजता संभाजी पेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर 17 वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांच्या सहभाग असणाऱ्या खो-खो तसेच भव्य कबड्डी स्पर्धा होतील. हे तिनही उपक्रम संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात अयोजीते केले असून यावेळी शहरातील लोकप्रतिनिधींची, प्रशासकीय अधिकारी तसेच श्री गणेश महासंघाचे आजी माजी अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष, महिला समिती, चिटणीस, सरचिटणीस, प्रमुख सल्लागार, युवा सचिव यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या उपक्रमात श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, किशोर तुळशी बागवाले, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, हरीश शिंदे, निखिल चव्हाण, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे, यांची उपस्थिती होती. प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संजय राखूडें, सुमित दंडुके यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow