प्रसिद्ध क्रीकेट कोच शेख हबीब यांची अचानक एक्झिट, क्रीकेट जगताला धक्का
प्रसिद्ध क्रीकेट कोच शेख हबीब यांची अचानक एक्झिट, क्रीकेट जगताला धक्का
त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे व हस-या चेह-याने ते परिचित होते, इंडियन क्रिकेट टिमीच्या अनेक खेळाडूंसोबत त्यांनी क्रीकेट खेळून अनेक मैदान गाजवले...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज) प्रसिद्ध क्रीकेट कोच शेख हबीब सर पिता शेख अहेमद , वय अंदाजे 54, राहणार खोकडपुरा, पैठण गेट यांचे आज सायंकाळी तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक एक्झिटने क्रीकेट जगताला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर हि बातमी व्हायरल होताच त्यांच्या चाहत्यांनी खोकडपूरा निवासस्थानी गर्दी केली. त्यांचा मुलगा विदेशात आहे. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातीपोती असा मोठा परिवार आहे.
शहरात अनेक क्रीकेटर त्यांनी घडवले. रणजी ट्रॉफी पण खेळलेली आहे. अनेक ट्राॅफी व बक्षिसे त्यांना मिळाली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी क्रीकेटचे धडे युवकांना दिले. आमखास मैदानावर मोठे इंटरनॅशनल स्टेडियम बनावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचा जास्त वेळ मैदानावर जात असे, आमखास मैदान व शहरातील व राज्यात विविध क्रीकेट टुर्नामेंट यशस्वी करण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अचानक निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.
त्यांची नमाज-ए-जनाजा आज रात्री 2 वाजता शमा हाॅस्पीटल जवळ, खोकडपुरा येथील सफिना मस्जिद येथे अदा केली जाईल तर दफनविधी क्रांतीचौक येथील कब्रस्तानात होणार असल्याची माहिती त्यांचे शेजारी हफीज अली यांनी दिली आहे.
What's Your Reaction?